Join us
Daily Top 2 Weekly Top 5

उन्हाळ्यात घामानं हैराण झालात? अंघोळीच्या पाण्यात 'हा' पदार्थ घाला, दिवसभर फ्रेश वाटेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2026 12:57 IST

How To Get Rid Of Sweat Smell In Summer (Summer Odor Management Tips) : ओले कपडे जास्तवेळ घालून ठेवू नका. यामुळे बॅक्टेरिया वाढतात आणि दुर्गंध येतो.

उन्हाळ्यात दुर्गंध आणि घामापासून बचावासाठी शरीराची  खास काळजी घ्यावी लागते. कमीत कमी २ वेळा अंघोळ करा आणि एंटी बॅक्टेरिअल साबणाचा वापर करा. सैल, सुती कपडे घाला जेणेकरून शरीराला हवा लागेल ज्या ठिकाणी घाम जास्त येतो अशा ठिकाणी टॅल्कम पावडर किंवा डिओडोरंट लावायला विसरू नका. लिंबू, गुलाबजल आणि बेकिंग सोडा यांसारखे घरगुती उपाय दु्र्गंध कमी करण्यास मदत करतात. योग्य प्रमाणात पाणी प्यायल्यानं आणि हलका आहार घेतल्यानं शरीर थंड राहतं. ओले कपडे जास्तवेळ घालून ठेवू नका. यामुळे बॅक्टेरिया वाढतात आणि दुर्गंध येतो. (How To Get Rid Of Sweat Smell In Summer)

उन्हाळ्याच्या दिवसांत घाम येणं खूपच कॉमन आहे. उन्हामुळे शरीराला अधिक घाम येतो.  शरीर बॅक्टेरियाजच्या संपर्कात येते ज्यामुळे दुर्गंध येतो.  दीर्घकाळ उन्हात राहणार्‍या लोकांना ही समस्या जास्त प्रमाणात उद्भवते. म्हणूनच उन्हाळ्याच्या दिवसांत साफ-सफाई, योग्य कपडे आणि शरीराची काळजी घेणं खूपच गरजेचं आहे.

घामाचा वास घालवण्यासाठी महागडे परफ्यूम वापरणं टाळा. काही घरगुती उपाय जास्त फायदेशीर ठरू शकतात. लिंबू, बेकिंग सोडा, गुलाबजल आणि तुरटी असे पदार्थ शरीराचा दुर्गंध कमी करतात. हे नैसर्गिक पदार्थ  शरीर ताजंतवानंही ठेवतात.

लिंबाचा रस

घामाचा दुर्गंध कमी करण्यासाठी तुम्ही अंघोळीच्या पाण्यात लिंबाचा रस मिसळू शकता. लिंबात नैसर्गिक एंटी बॅक्टेरिअल गुण असतात. ज्यामुळे शरीरात दुर्गंध निर्माण करणारे बॅक्टेरिया कमी होतात आणि त्वचा साफ राहते. उन्हाळ्याच्या दिवसांत शरीराला येणारा दुर्गंध कमी करण्यासाठी हा उत्तम उपाय आहे. ज्यामुळे ताजेपणा टिकून राहतो.

गुलाब पाणी

उन्हाळ्याच्या दिवसांत घामाचा वास घालवण्यासाठी गुलाब पाण्याचा वापर फायदेशीर ठरतो. गुलाब पाण्यामुळे शरीराला गारवा मिळतो. यातील नैसर्गिक गुण दुर्गंध कमी करतात आणि शरीर फ्रेश ठेवतात. अंघोळीच्या पाण्यात थोडं गुलाब पाणी मिसळून अंघोळ करा. संपूर्ण दिवस ताजंतवानं वाटेल. हा उपाय सेंसिटिव्ह त्वचा असलेल्यांसाठी एक सुरक्षित उपाय आहे.

तुरटी

तुरटीच्या साहाय्यानं घामाचा वास दूर करणं हा घरगुती उपाय आहे. यातील एंटीसेप्टीक गुण शरीर दुर्गंध निर्माण करणारे बॅक्टेरिया कमी करण्यास मदत करतात. ज्यामुळे त्वचेचे पोर्स स्वच्छ राहतात आणि शरीर ताजंतवानं राहण्यास मदत होते. 

बेकींग सोडा

बेकींग सोडा दुर्गंध दूर करण्यासाठी एक स्वस्त, सोपा उपाय आहे. ज्यामुळे शरीरचं पीएच लेव्हल संतुलित राहतं. बेकींग सोडा दुर्गंध कमी करतो आणि त्वचा साफ, ताजी राहते. यासाठी अंघोळीच्या पाण्यात १ चमचा बेकींग सोडा मिसळून अंघोळ करा. 

English
हिंदी सारांश
Web Title : Beat summer sweat: Add this to bathwater for all-day freshness.

Web Summary : Fight summer sweat with simple home remedies. Add lemon juice, rose water, baking soda, or alum to your bathwater for a refreshing and odor-free day. These natural ingredients combat bacteria and keep you feeling fresh.
टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्यलाइफस्टाइल