Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > बहुसंख्य महिलांना छळतोय थायरॉईड, पाहा कशी करायची तपासणी आणि प्रत्यकीने कशी घ्यायची काळजी..

बहुसंख्य महिलांना छळतोय थायरॉईड, पाहा कशी करायची तपासणी आणि प्रत्यकीने कशी घ्यायची काळजी..

Thyroid is a problem for most women, see how to get tested and how to take care of yourself : थायरॉईडचे वाढते प्रमाण महिलांसाठी धोकादायक आहे. पाहा काय उपाय करायचे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2025 13:41 IST2025-06-19T13:40:47+5:302025-06-19T13:41:44+5:30

Thyroid is a problem for most women, see how to get tested and how to take care of yourself : थायरॉईडचे वाढते प्रमाण महिलांसाठी धोकादायक आहे. पाहा काय उपाय करायचे.

Thyroid is a problem for most women, see how to get tested and how to take care of yourself | बहुसंख्य महिलांना छळतोय थायरॉईड, पाहा कशी करायची तपासणी आणि प्रत्यकीने कशी घ्यायची काळजी..

बहुसंख्य महिलांना छळतोय थायरॉईड, पाहा कशी करायची तपासणी आणि प्रत्यकीने कशी घ्यायची काळजी..

थायरॉईडचे नाव ऐकल्यावर आपल्याला तो आजार आहे असेच वाटते. मात्र थायरॉईड ही एक अंतस्त्रावी ग्रंथी आहे. जी मानेच्या पुढील भागात असते. ही ग्रंथी ट्रायआयोडोथायरोनिन (T3) आणि थाय्रॉक्सिन (T4) हे हार्मोन्स तयार करायचे काम करते. हे हार्मोन्स शरीरासाठी फार गरजेचे असते. (Thyroid is a problem for most women, see how to get tested and how to take care of yourself)पचनासाठी उपयुक्त ठरतात. तसेच शरीराच्या तापमानावर नियंत्रण ठेवतात. हृदयासाठी गरजेचे असतात. मानसिक आरोग्य चांगले राहावे यासाठी मदत करतात. या ग्रंथीच्या कामात काही अडचण आली किंवा बिघाड झाला की मग थायरॉईडचे त्रास सुरु होतात. त्याचेही बरेच पैलू असतात. 

१. हायपोथायरॉईडीझम या प्रकारात हार्मोन्सची निर्मिती कमी होते. त्यामुळे थकवा येतो तसेट वजन वाढते. सतत उष्ण वाटते. शरीर तापमानात सतत बदल होतो. चिंता, ताणतणाव असे त्रास होतात. 

२. हायपरथायरॉईड असेल तर मग हार्मोन्सची निर्मिती प्रमाणापेक्षा जास्त होते आणि वजन झटकन कमी होते. हृदयाचे ठोके वाढतात. हात थरथरायला लागतात. असे इतरही काही त्रास होतात. 

३. काही गंभीर आजारही या ग्रंथीच्या कार्यात बिघाड झाल्यामुळे उद्भवतात. त्याची लक्षणे सामान्य असल्याने पटकन ओळखता येत नाही. त्यामुळे वेळोवेळे चेकअप करायला हवे. 

थायरॉईडच्या त्रासाचे प्रमाण महिलांमध्ये जास्त असते. याचे कारण म्हणजे हार्मोनल फरक आणि जीवनशैली. महिलांचे शरीर संपूर्ण वेगळे असते. महिलांनी काळजी घेणे फार गरजेचे आहे कारण थायरॉईडची समस्या आजकाल फारच कॉमन झाली आहे.   

थायरॉईडची लक्षणे जाणून घ्या. 
१. थकवा येणे आणि शरीरातील ऊर्जा कमी होणे 
२. शरीराच्या तापमानात सारखा बदल होणे.
३. भरपूर केस गळणे आणि त्वचा कोरडी पडणे. 
४. मासिक पाळी अनियमित होते. 
५. मानसिक थकवा आणि नैराश्य. 
६. वजन अचानक वाढते किंवा घटते. 

सगळ्यात महत्वाचा उपाय म्हणजे नियमित तपासणीसाठी जाणे. महिला मासिक , वार्षिक तपासणी करत नाहीत त्यामुळे आजार फार वाढल्यावर कळतो. वेळीच कळल्यावर त्यावर उपाय करणे सहज शक्य होते. त्यामुळे काळजी घेणे कायम चांगलेच. आहार योग्य घ्यायचा. संतुलित आहार महत्वाचा. तसेच नियमित व्यायाम करायला हवा. डॉक्टरांकडे जाऊन वेळीच उपचार करायला हवेत. थायरॉईडचा त्रास पुढे जाऊन फार वाढू शकतो. वेळीच उपाय करा. 

Web Title: Thyroid is a problem for most women, see how to get tested and how to take care of yourself

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.