Join us
Daily Top 2 Weekly Top 5

थायरॉईड झाल्यास शरीरात कोणते बदल होतात? ५ असे संकेत जे वेळीच ओळखा आणि मोठा धोका टाळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2026 10:43 IST

Thyroid Imbalance Signs: सुरूवातीला थायरॉईडची लक्षणं हलकी वाटू शकतात, पण यांकडे जर दुर्लक्ष केलं तर आरोग्यासंबंधी अनेक गंभीर समस्यांचा धोका वाढतो. अशात थायरॉईडचे काय संकेत असतात हे जाणून घेऊया. जेणेकरून मोठा धोका टाळता येईल.

Thyroid Imbalance Signs: थायरॉईडची समस्या महिलांसाठी एक मोठी डोकेदुखी आहे. अलिकडे तर ही समस्या फार जास्त वाढली आहे. पुरूषांपेक्षा महिलांनाच हा त्रास जास्त छळतो. मुळात अनेकांना ही समस्या असते, पण त्यांनी थायरॉईड म्हणजे काय हेच माहीत नसतं. तर थायरॉईडची फुलपाखराच्या आकाराची ग्रंथी असते, जी आपल्या गळ्यात असते आणि शरीराच्या मेटाबॉलिज्मला कंट्रोल करण्यासाठी हार्मोन तयार करते. जेव्हा ही ग्रंथी कमी किंवा जास्त प्रमाणात हार्मोन तयार करते तेव्हा शरीरातील वेगवेगळी कामं प्रभावित होतात. सुरूवातीला याची लक्षणं हलकी वाटू शकतात, पण यांकडे जर दुर्लक्ष केलं तर आरोग्यासंबंधी अनेक गंभीर समस्यांचा धोका वाढतो. अशात थायरॉईडचे काय संकेत असतात हे जाणून घेऊया. जेणेकरून मोठा धोका टाळता येईल.

थायरॉईड झाल्यावर दिसणारे ५ मोठे संकेत

- अमेरिकेच्या क्लीवलँड क्लीनिकच्या रिपोर्टनुसार, थायरॉईड झाल्यावर दिसणारं सगळ्यात कॉमन लक्षण म्हणजे अचानक वजन वाढणं किंवा कमी होणं. हायपोथायरॉयडिज्ममध्ये मेटाबॉलिज्म स्लो होतं, ज्यामुळे वजन अचानक वाढू लागतं. तर हायपरथायरॉयडिज्ममध्ये मेटाबॉलिज्म बूस्ट होतं, ज्यामुळे वजन वेगाने कमी होऊ लागतं. या गोष्टी थायरॉईडकडे इशारा करतात. जर पुरेशी झोप घेतल्यानंतरही सतत थकवा जाणवत असेल तर याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका.

- हायपोथायरॉईडमध्ये शरीराची ऊर्जा उत्पादन क्षमता कमी होते, ज्यामुळे आपल्याला सुस्ती जाणवते, थकवा जाणवतो. तर दुसरीकडे हायपरथायरॉईडमध्ये अस्वस्थता आणि कमी झोपेमुळेही कमजोरी जाणवते. ही लक्षणं जर जास्त दिवस दिसत असली तर टेस्ट नक्की करावी.

- थायरॉईड हार्मोन केस आणि त्वचेचं आरोग्यही प्रभावित करतात. हायपोथायरॉईडमध्ये केस पातळ आणि रखरखीत होऊ शकतात, केस जास्त गळतात आणि त्वचाही कोरडी होते. तेच हायपरथायरॉईडमध्येही केस कमजोर होऊ शकतात. जर अचानक केसांच्या गुणवत्तेत बदल दिसेल, तर याला केवळ सामान्य समस्या समजून कानाडोळा करणं महागात पडू शकतं.

- हायपरथायरॉयडिज्ममध्ये हृदयाचे ठोके वाढतात, घाबरल्यासारखं वाटतं आणि चिडचिडही वाढू शकते. तेच हायपोथायरॉईडमध्ये हृदयाचे ठोके स्लो होऊ शकतात आणि व्यक्ती डिप्रेशनमध्ये जाऊ शकते, त्याची स्मरणशक्ती कमी होऊ शकते किंवा त्याला फोकस करण्यासक समस्या होऊ शकते. ही लक्षणं अनेकदा स्ट्रेस समजून त्यांकडे दुर्लक्ष केलं जातं. पण पुन्हा पुन्हा जर असं होत असेल तर वेळीच डॉक्टरांना भेटा.

- महिलांमध्ये थायरॉईड असंतुलनामुळे मासिक पाळी प्रभावित होऊ शकते. मासिक पाळी अनियमित येणे, जास्त किंवा कमी ब्लीडिंग किंवा गर्भधारणेत समस्या थायरॉईडच्या समस्येचे संकेत असू शकतात. पुरूषांमध्येही हार्मोन असंतुलन झाल्यास लैंगिक आरोग्यासंबंधी समस्या होऊ शकतात. जर हे सगळे संकेत जास्त काळ राहिले तर हार्मोनची टेस्ट वेळीच केली पाहिजे.

English
हिंदी सारांश
Web Title : Thyroid Symptoms: Recognize These Signs Early to Avoid Major Health Risks

Web Summary : Thyroid imbalance causes weight changes, fatigue, hair issues, heart palpitations, and menstrual irregularities. Early detection through testing is crucial for managing these symptoms and preventing serious health complications in both men and women. Don't ignore these key indicators.
टॅग्स : स्त्रियांचे आरोग्यआरोग्यहेल्थ टिप्स