Join us
Daily Top 2 Weekly Top 5

जास्तच केस गळतात , वजन वाढतंय आणि थकवा जाणवतोय ? थायरॉईडचा त्रास तर नाही ना ? 'असे' ओळखा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2026 16:36 IST

Thyroid can cause many problems , see how to identify , healthcare tips Thyroid Symptoms: थायरॉईडचा असेल तर कसा ओळखावा वेळीच ?

आजकाल अनेक लोकांना सतत थकवा येणे, अचानक वजन वाढणे, केस गळणे किंवा मूड बदलणे यांसारखे त्रास जाणवतात. काही वेळा हे सामान्य वाटणारे बदल प्रत्यक्षात थायरॉईडच्या समस्येमुळे होत असण्याची शक्यता असते. (Thyroid can cause many problems, see how to identify, healthcare tips )विशेषतः महिलांमध्ये थायरॉईडचा त्रास मोठ्या प्रमाणात आढळतो. अनेकांना बराच काळ हा त्रास आहे हे लक्षातही येत नाही, कारण त्याची लक्षणे रोजच्या सामान्य समस्यांसारखी वाटतात.

थायरॉईड ही मानेला पुढच्या बाजूला असलेली एक छोटी ग्रंथी असते. ही ग्रंथी शरीरातील अनेक महत्त्वाच्या गोष्टी नियंत्रित करते. शरीरातील ऊर्जा, वजन, हृदयाचे ठोके, पचन, शरीराचे तापमान आणि हार्मोन्सचे संतुलन राखण्यात थायरॉईडची मोठी भूमिका असते. जेव्हा ही ग्रंथी योग्य प्रमाणात हार्मोन्स तयार करत नाही तेव्हा शरीरात वेगवेगळे बदल दिसू लागतात. 

थायरॉईडचे मुख्यतः दोन प्रकारचे त्रास असतात. एक म्हणजे hypothyroidism, ज्यामध्ये हार्मोन्स कमी प्रमाणात तयार होतात आणि दुसरा hyperthyroidism, ज्यामध्ये हार्मोन्स जास्त प्रमाणात तयार होतात. वजन वाढणे, शरीर सुस्त वाटणे आणि सतत झोप येणे ही hypothyroidism ची सामान्य लक्षणे असू शकतात. काही लोक खूप कमी खात असूनही त्यांचे वजन वाढत राहते. अशावेळी केवळ आहार किंवा व्यायाम कारणीभूत नसून थायरॉईडची समस्या असू शकते.(Thyroid Symptoms)

केस गळणे हे ही थायरॉईडच्या त्रासाचे एक महत्त्वाचे लक्षण मानले जाते. हार्मोन्समध्ये बदल झाल्याने केस पातळ होणे, कोरडे होणे किंवा जास्त प्रमाणात गळणे सुरू होऊ शकते. त्वचा कोरडी पडणे, चेहरा सुजल्यासारखा दिसणे किंवा नखे कमकुवत होणे असे बदलही काही लोकांमध्ये दिसतात.

घशाशी संबंधित काही त्रासही थायरॉईडमुळे होऊ शकतात. काही वेळा मानेला सूज आल्यासारखे वाटणे, गिळताना त्रास होणे किंवा घशात दाब जाणवणे अशी लक्षणे दिसू शकतात. सतत डोकेदुखी, मूड बदलणे, चिडचिड किंवा एकाग्रता कमी होणे हे ही काही लोकांमध्ये जाणवू शकते.

महिलांमध्ये मासिक पाळी अनियमित होणे, जास्त थकवा किंवा हार्मोनल बदल यामागेही थायरॉईड कारणीभूत असू शकते. काही लोकांना सतत थंडी वाजणे, तर काहींना जास्त घाम येणे अशी लक्षणेही दिसतात. थायरॉईडचा त्रास ओळखण्यासाठी रक्ततपासणी केली जाते. योग्य वेळी निदान झाल्यास औषधे, योग्य आहार आणि जीवनशैलीतील बदल यांच्या मदतीने हा त्रास नियंत्रणात ठेवता येतो. मात्र इंटरनेटवरील माहिती पाहून स्वतःहून औषधे सुरू करणे टाळावे. डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक असते.

English
हिंदी सारांश
Web Title : Hair loss, weight gain, fatigue? Could be thyroid issues!

Web Summary : Fatigue, weight gain, and hair loss could signal thyroid problems, common in women. The thyroid regulates vital functions; imbalances cause various symptoms. Blood tests are crucial for diagnosis, enabling control through medication, diet, and lifestyle changes. Consult a doctor before self-treating.
टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्यहोम रेमेडीमहिलात्वचेची काळजीकेसांची काळजी