Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब

बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब

बेडरूममधल्या काही गोष्टींची आपण नीट काळजी घेतली नाही तर आपल्या आरोग्याला त्याचा मोठा फटका बसून शकतो.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2025 15:00 IST2025-06-15T14:59:11+5:302025-06-15T15:00:19+5:30

बेडरूममधल्या काही गोष्टींची आपण नीट काळजी घेतली नाही तर आपल्या आरोग्याला त्याचा मोठा फटका बसून शकतो.

throw these 3 things out of your bedroom immediately may spoil stomach and your night sleep | बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब

बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब

बेडरूम आपल्यासाठी आणि कुटुंबासाठी एक कम्फर्ट झोन आहे, जिथे आपल्याला शांततेचे क्षण घालवायला आवडतात, परंतु जर बेडरूममधल्या काही गोष्टींची आपण नीट काळजी घेतली नाही तर आपल्या आरोग्याला त्याचा मोठा फटका बसून शकतो. आपण काही गोष्टींबद्दल सतर्क असलं पाहिजे. बेडरूममधील काही खास गोष्टी आपल्या आरोग्याच्या शत्रू बनू शकतात. प्रसिद्ध गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. सौरभ सेठी यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये म्हटलं आहे की, बेडरूममधील ३ वस्तू शक्य तितक्या लवकर खोलीतून बाहेर फेकून द्याव्यात.

जुनी उशी

जुन्या उशांमध्ये धुळीचे कण जमा होतात, त्यामुळे जास्त घाम येऊ शकतो आणि ऍलर्जी होऊ शकते. जर उशा एक किंवा दोन वर्ष जुन्या झाल्या असतील तर त्या बदलण्याची वेळ आली आहे. यामुळे चेहऱ्यावरील त्वचा देखील खराब, तेलकट होऊ शकते. 


सिंथेटिक रूम फ्रेशनर

सिंथेटिक रूम फ्रेशनर भरपूर phthalates सोडतात. त्यात वोलाटाइल ऑर्गेनिक कंपाउंड्स देखील असतात, जे श्वसनासंबंधित समस्या निर्माण करतात आणि हार्मोनल त्रासही होऊ शकतो. एका अभ्यासात असं दिसून आलं आहे की, ८६ टक्के एअर फ्रेशनर्समध्ये फॅथलेट्स असतात, ज्याचे केमिकल्स प्रजननक्षमतेला हानी पोहोचवू शकतात आणि दम्याच्या समस्या देखील वाढवू शकतात. 

जुनी गादी

तिसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जुनी गादी, जी बेडरूममधून काढून टाकावी. जर गादी ७ ते १० वर्षांपेक्षा जास्त जुनी असेल तर त्यामुळे झोपेची गुणवत्ता कमी होऊ शकते आणि पाठदुखीचा त्रास देखील होऊ शकतो. बेडरूममधील वातावरण नेहमी प्रसन्न ठेवा जेणेकरून आरोग्य चांगलं राहिल.

Web Title: throw these 3 things out of your bedroom immediately may spoil stomach and your night sleep

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.