Bloating Cause : बऱ्याच लोकांना नेहमीच पोट फुगण्याची समस्या होत राहते. दिवसभर पोट फुगण्याची समस्या होण्यामागे गॅस आणि अॅसिडिटी ही कारणं सांगितली जातात. पण जर पोट फुगण्यासोबतच आपल्याला थकवा आणि मेंटल कंडिशनमध्ये काही बदल दिसत असेल तर ही समस्या खाण्या-पिण्यामुळे नाही तर शरीरात पोषणासंबंधी काही समस्यांमुळेही होऊ शकते. थकवा, पोट फुगणे आणि मानसिक संतुलन होत सतत होत असेल याकडे अजिबात दुर्लक्ष करू नये. कारण शरीरात काही पोषक तत्व कमी झाल्यावरही या गोष्टी घडतात.
पोट फुगण्याचे कारण
आयर्नची कमतरता - शरीरात आयर्नची कमतरता झाल्याने अॅनिमिया होतो. जर आपल्याला पोट फुगणे, थकवा आणि मूड बदलणे अशी लक्षणं दिसत असेल तर आयर्नची कमतरता आणि अॅनिमियाही होऊ शकतो. डॉक्टरांनुसार, जेव्हा शरीरात आयर्नची कमतरता होते, तेव्हा शरीरात हलकी सूज येऊ शकते, ज्यामुळे थकवा, चिडचिड आणि टेंशनसारखी लक्षणंही दिसू शकतात.
हीमोग्लोबिनची कमतरता - आयर्न शरीरात हीमोग्लोबिन निर्माणापासून ते ऑक्सिजन, मेंदूच्या क्रिया आणि इम्यूम सिस्टीम बरोबर ठेवण्यात महत्वाची भूमिका बजावतं. आयर्न कमी झाल्याने शरीरातील अनेक क्रिया प्रभावित होतात, ज्यामुळे सतत शारीरिक आणि मानसिक लक्षणं जाणवू शकतात.
आयर्न आणि हिमोग्लोबिनची कमतरता – लक्षणे
शरीरात आयर्न किंवा हीमोग्लोबिन कमी झालं, म्हणजेच अॅनिमिया झाल्यास मेंदू आणि संपूर्ण शरीराला पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे सतत थकवा जाणवतो, मानसिक आळस येतो, चिडचिड वाढते आणि मन उदास राहते.
काही महिलांना यामुळे पोट फुगणे, शरीर जड वाटणे आणि व्यायाम करताना लवकर थकवा येणे अशा तक्रारी जाणवतात. याचा परिणाम मूड स्विंग्सवरही होतो. अनेक वेळा पोषणतत्त्वांची कमतरता, पचनाच्या समस्या किंवा हार्मोनल असंतुलनामुळे होणारी दीर्घकालीन सूज, मेटाबॉलिझममध्ये बिघाड आणि हार्मोन्समधील बदल ही लक्षणे अधिक तीव्र करू शकतात.
पोट फुगण्याची समस्या कशी कमी करावी
यासाठी योग्य तपासणी करून घेणे खूप महत्त्वाचे आहे. कारण जी लक्षणे आपण सामान्य समजून दुर्लक्ष करतो, ती पुढे जाऊन मोठी समस्या निर्माण करू शकतात. जर पुरेशी विश्रांती, आहारात बदल किंवा जीवनशैलीत सुधारणा करूनही काही फरक पडत नसेल, तर डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. डॉक्टर हीमोग्लोबिन, फेरिटिन, व्हिटामिन B12 तसेच सूजेसंबंधित तपासण्या सुचवू शकतात, ज्यामुळे नेमकं कारण समजू शकतं आणि योग्य उपचार करता येतात.
