Heart Block Sign : आपल्या शरीराची सिस्टीम इतकी खास आहे की, त्यावर कधी कधी विश्वासही बसत नाही. कारण शरीराच्या आत एखादी बारीक जरी गडबड झाली असेल तर याची लक्षणं शरीर दाखवतं. आता हेच बघा ना बऱ्याच लोकांना पाय सतत थंड राहण्याची समस्या असते. काही लोक याकडे लक्ष देतात तर काही लोक दुर्लक्ष करतात. पण नेहमीच पाय थंड (Cold feet) राहत असतील तर हा हृदयात ब्लॉकेजचा इशारा असतो.
हृदयरोग एक्सपर्ट डॉ. सुरेंद्र देवडा यांच्यानुसार पाय नेहमीच थंड राहत असतील तर हा हार्टमध्ये ब्लॉकेजचा संकेत असू शकतो. ते अलिकडेच jagran.com सोबत बोलत होते. तसेच अॅनीमिया, हाय शुगर, हाय कोलेस्टेरॉल असलेल्या व्यक्तींचे देखील पाय थंड राहू शकतात. इतकंच नाही तर ज्या लोकांमध्ये व्हिटॅमिन बी ११ कमी असतं, त्यांच्या शरीरात लाल रक्तपेशी तयार होत नाहीत आणि यामुळे पायांमधील रक्तप्रवाह बाधित होतो. अशात यावर काय उपाय करावे हेही डॉक्टरांनी सांगितलं.
जर पाय जास्तवेळ थंड राहत असतील तर यामागे तीन कारणं असू शकतात. पायांच्या नसांमध्ये ब्लॉकेज, कमी रक्त पुरवठा आणि शरीरातील ब्लड सर्कुलेशन कमी होणे. या गोष्टींकडे गंभीरतेने बघायला हवं. कारण हे हृदयाच्या धमण्या आकुंचन पावल्याचे संकेत असू शकतात.
गरम कपडे वापरा
जे लोक थंड तापमानात राहतात, त्यांनी शरीर गरम ठेवण्यासाठी प्रयत्न करावे. पाय गरम ठेवण्यासाठी गरम शूज आणि चप्पल घाला. कारण पायांमधील थंडी शरीराच्या वरच्या भागात जाऊ शकते.
व्हिटामिन बी १२ आणि आयर्नयुक्त फूड्स
व्हिटामिन बी १२ आणि आयर्न असलेले पदार्थ खाल्ले तर हाडं मजबूत होतात आणि वेदना दूर होतात. त्यामुळे पालक, बीट, ब्रोकली, डेअरी उत्पादनांचा आहारात समावेश करा. या गोष्टींमुळे शरीरात रेड ब्लड सेल्सचं उत्पादन वाढतं.
गरम पाण्यात पाय ठेवा
थंड पायांसाठी ही एक खास थेरपी आहे. यानं पायांचं थंडावा कमी होतो आणि सूजही कमी होते. पाय गरम पाण्यात ठेवा. दिवसातून एकदा हा उपाय कराल तर फायदा मिळेल. पायांमधील तणावही कमी होईल.
मालिश करा
पायांना उष्णता देण्यासाठी हा उपाय फार पूर्वीपासून केला जातो. कोमट तेलानं पायांची मालिश करावी. मोहरीचं तेल, ऑलिव्ह ऑइलनं पायांची मालिश करू शकता. यामुळे पायांमधील रक्तप्रवाह सुरळीत होईल.
आल्याचा वापर
आल्यामध्ये अॅंटी-ऑक्सीडेंट्स आणि सूज कमी करणारे गुण असतात. अशात आल्याची कॅंडी, आल्याचा चहा किंवा कच्चं आलं चावून खाल्ल्यास पाय थंड होणं कमी होऊ शकतं.
अनेकदा रक्तदाब कमी झाल्यावर पाय थंड पडतात. जर चालण्याचं प्रमाण कमी झालं असेल तर लगेच पायाच्या नसांची तपासणी करा. ब्लॉकेज आहेत की नाही याची माहिती घ्या. या स्थितीत धुम्रपान आणि मद्येसवन घातक ठरू शकतं.