Heart Health Test : हृदय हे शरीरातील सर्वात महत्त्वाच्या अवयवांपैकी एक आहे. ते सतत रक्त पंप करून पूर्ण शरीराला ऑक्सिजन आणि आवश्यक पोषक घटक पोहोचवतं, तसेच शरीरातील घाण आणि टॉक्सिन्स बाहेर काढण्यास मदत करतं. म्हणूनच हृदयाच्या आरोग्याकडे लक्ष देणे अत्यंत गरजेचे ठरते. पण अलिकडे अनेकांचं हृदय कमी वयातच कमजोर होऊ लागलं आहे. अशात आपलं हृदय कमजोर आहे की फिट हे तपासण्यासाठी एका संकेताकडे लक्ष देऊ शकता.
दिल्लीतील प्रसिद्ध कार्डिओलॉजिस्ट आणि फंक्शनल मेडिसिन तज्ज्ञ डॉ. आलोक चोप्रा यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी एका अतिशय सोप्या पण महत्त्वाच्या नंबरबद्दल सांगितले आहे, जो शांतपणे हे संकेत देतो की तुमचे हृदय किती मजबूत आणि फिट आहे. डॉ. चोप्रा यांच्या मते, हृदयाचं फिटनेस जाणून घेण्यासाठी फक्त कोलेस्टेरॉल किंवा ब्लड प्रेशर पुरेसं नसतं. तो महत्त्वाचा नंबर म्हणजे रेस्टिंग हार्ट रेट.
रेस्टिंग हार्ट रेट म्हणजे काय?
रेस्टिंग हार्ट रेट म्हणजे तुम्ही पूर्णपणे शांत अवस्थेत बसलेले किंवा झोपलेले असताना, तुमचे हृदय एका मिनिटात किती वेळा धडधडतं, ती संख्या. हा हृदयाच्या फिटनेसचा सर्वात सोपा पण अत्यंत प्रभावी संकेत मानला जातो.
हेल्दी रेस्टिंग हार्ट रेट किती असावं?
बहुतेक लोकांसाठी प्रति मिनिट 60 ते 80 हृदयाची धडधड होणं हा हेल्दी रेस्टिंग हार्ट रेट मानला जातो. तर खेळाडू किंवा अतिशय फिट लोकांमध्ये हा रेट 40–50 बीट्स प्रति मिनिट इतका कमीही असू शकतो. कारण त्यांचे हृदय प्रत्येक ठोक्यात जास्त प्रमाणात रक्त पंप करत असतं.
रेस्टिंग हार्ट रेट जास्त असल्यास काय अर्थ होतो?
सतत जास्त रेस्टिंग हार्ट रेट असणे हे हृदयावर ताण असल्याचे लक्षण असू शकते. यामागची काही सामान्य कारणे अशी असू शकतात.
अपूर्ण किंवा खराब झोप
शरीरात पाण्याची कमतरता
मानसिक ताणतणाव
जास्त प्रमाणात कॅफिनं सेवन
एखादी वैद्यकीय समस्या
हृदय मजबूत कसे बनवावे?
नियमित व्यायाम करा
मेडिटेशन आणि रिलॅक्सेशनचा रूटीनमध्ये समावेश करा
रोज किमान 8 ग्लास पाणी प्या
संतुलित आणि पौष्टिक आहार घ्या
पुरेशी झोप घ्या
या सर्व सवयी एकत्रितपणे हृदय मजबूत बनवतात आणि रेस्टिंग हार्ट रेट स्थिर ठेवण्यास मदत करतात. वेळोवेळी आपली रेस्टिंग हार्ट रेट तपासत राहा. जर त्यात अचानक वाढ दिसून आली, तर तो तुमच्या शरीराकडून मिळणारा एक प्रारंभिक इशारा असू शकतो.
Web Summary : A healthy resting heart rate (60-80 bpm) indicates good heart health. A consistently high rate may signal stress. Regular exercise, hydration, and balanced diet are key to a strong heart.
Web Summary : स्वस्थ हृदय गति (60-80 बीपीएम) अच्छे हृदय स्वास्थ्य का संकेत है। लगातार उच्च दर तनाव का संकेत दे सकती है। नियमित व्यायाम, जलयोजन और संतुलित आहार मजबूत हृदय की कुंजी हैं।