Join us

वजनानुसार ठरतं लघवीचं प्रमाण, तुम्हाला कमी किंवा अधिक प्रमाणात लघवी होतेय का? ‘असं तपासा..

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2025 14:53 IST

Kidney Health Test at Home : दिवसाकाठी योग्यप्रमाणात लघवी होते ना, याकडेही लक्ष हवं. विशेषत: हाय ब्लडप्रेशर, डायबिटिस असे आजार असेल तर जास्त लक्ष द्यायला हवं.

Kidney Health Test at Home : शरीरातील प्रत्येक अवयवाची काहीना काही जबाबदारी असते. हे अवयव आपापली कामं करत असतात. ज्यामुळे शरीर निरोगी राहतं आणि फिट राहतं. किडनी याच अवयवांपैकी एक आहे. किडनी शरीरातील विषारी तत्व बाहेर काढण्याचं आणि रक्त फिल्टर करण्याचं काम करतात. पण आजकाल आपल्याच काही चुकांमुळे किडनीच्या वेगवेगळ्या समस्या होत आहेत. अशात किडनीमध्ये काय गडबड आहे हे जर वेळीच समजलं तर किडनी निरोगी ठेवण्यास मदत मिळू शकते.

किडनी रक्त फिल्टर करून शरीरातील विषारी तत्व बाहेर काढतात. त्याशिवाय ब्लड प्रेशर कंट्रोल करणे, रेड ब्लड सेल्सचं उत्पादन आणि हाडं मजबूत करण्यास मदत करतात. किडनीमध्ये काही मोठा बिघाड होईपर्यंत त्याकडे आपण लक्षच देत नाहीत. अशात किडनी आपलं काम बरोबर करत आहेत की नाही हे आपण घरीच चेक करू शकतो. 

लघवीचं प्रमाण

किडनीच्या माध्यमातून शरीराची आतून सफाई केली जाते. लघवीच्या माध्यमातून शरीरातील अनावश्यक तत्व बाहेर काढले जातात. अशात डॉक्टर जेव्हा किडनीच्या आरोग्य कसं आहे हे चेक करतात तेव्हा लघवीच्या प्रमाणाकडे लक्ष देतात. हे तेव्हा महत्वाचं ठरतं जेव्हा एखादी जखम झाली असेल, इन्फेक्शन झालं असेल किंवा शरीरात पाणी कमी झालं असेल.

नॅशनल किडनी फाऊंडेशनने आजवर अनेक अभ्यास प्रसिध्द केले आहे. त्यापैकी काही अभ्यास असं सांगतात की,  एका हेल्दी व्यक्तीला दर तासाला त्याच्या वजनानुसार, जवळपास ०.५ ते १ मिलीलीटर लघवी व्हायला हवी. म्हणजे जर आपलं वजन ६० किलो असेल तर १ तासात आपल्याला ३० ते ६० मिली लघवी होणं नॉर्मल आहे. जर लघवीचं प्रमाण याच्या आसपास असेल तर किडनी योग्यपणे काम करत असल्याचा हा संकेत आहे.

घरीच कशी कराल टेस्ट?

दिवसातील कोणतेही १० तास निवडा. एक स्वच्छ एक लीटरची बॉटल घ्या. त्यावर प्रमाणाच्या खूणा असल्या पाहिजे.  जेवढी लघवी कराल ती या बॉटलमध्ये जमा करा. १० तासांनंतर जमा झालेल्या लघवीचं प्रमाण चेक करा. जर आपलं वजन ६० असेल तर १० तासांमध्ये ३०० ते ६०० मिली लघवी होणं नॉर्मल आहे. जर वजन कमी किंवा जास्त असेल तर त्यानुसार लघवीच्या प्रमाणाचा अंदाज लावू शकता. जर आपल्याला डायबिटीस, हाय ब्लड प्रेशर असेल किंवा आपण पेनकिलर घेत असाल तर ही टेस्ट आपण महिन्यातून एक किंवा दोनदा करू शकता.

कमी लघवीचं कारण काय?

 लघवीचं प्रमाण  कमीअसेल तर याचा स्पष्ट असा अर्थ होतो की, आपली किडनी योग्यपणे काम करत नाहीये. यामागची कारणं वेगवेगळी असू शकतात. जसे की, पाणी कमी पिणे, ब्लड फ्लो कमी असणे किंवा किडनीमध्ये गडबड असणे.

किडनमध्ये बिघाडाची लक्षणं

लघवी जर कमी होत असेल तर हे किडनीमध्ये काहीतरी समस्या असल्याचं लक्षण असू शकतं. जर असं नेहमीच होत असेल तर याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. किडनीमध्ये काही समस्या असेल तर खालील काही लक्षणं दिसू शकतात.

पाय, टाचा आणि चेहऱ्यावर सूज

सतत थकवा आणि कमजोरी

लघवीमधून फेस आणि रंग बदलणे

मळमळ किंवा लक्ष केंद्रीत करण्यास समस्या

लघवीच्या प्रमाणावर लक्ष देणं ही एक किडनीचं आरोग्य जाणून घेण्याची एक चांगली पद्धत आहे. पण ही पद्धत मेडिकल टेस्टची जागा घेऊ शकत नाही. या घरच्या टेस्टनं फक्त बेसिक काहीतरी गडबड असल्याचं समजू शकतं. पण मेडिकल टेस्टनं नेमकं कारण आणि नेमकी समस्या समजू शकते. त्यामुळे समस्या जर जास्तच असेल तर वेळीच डॉक्टरांना दाखवा.

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्स