Join us

परिस्थिती गंभीर! कोरोनापेक्षाही जीवघेणा 'हा' आजार; हृदयावरच आघात, दरवर्षी १८ मिलियन मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 11:52 IST

जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) जगभरातील मृत्यूंच्या प्रमुख कारणांची यादी जाहीर केली आहे, ज्यामध्ये धक्कादायक माहिती समोर आली आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) जगभरातील मृत्यूंच्या प्रमुख कारणांची यादी जाहीर केली आहे, ज्यामध्ये धक्कादायक माहिती समोर आली आहे. रिपोर्टनुसार, २०२१ मध्ये जगभरात झालेल्या एकूण ६८ मिलियन मृत्यूंपैकी ५७% मृत्यूंसाठी १० आजार जबाबदार आहेत. यातील सर्वात मोठं कारण इस्केमिक हार्ट डिसीज आहे.

जगभरातील एकूण मृत्यूंपैकी १३ टक्के मृत्यूंसाठी हा आजार जबाबदार आहे. २००० नंतर या आजारामुळे २७ लाख मृत्यूंची वाढ झाली आहे आणि २०२१ मध्ये या आजारामुळे ९१ लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. तर कोरोनामुळे ८ लाख मृत्यू झाले आहेत. एका रिपोर्टनुसार, यामुळे दरवर्षी १८ मिलियन मृत्यू होतात. यावरून स्पष्ट होतं की, इस्केमिक हार्ट डिसीज कोरोना व्हायरसपेक्षा जास्त लोकांचा बळी घेत आहे.

सर्वात घातक आजार

इस्केमिक हार्ट डिसीज

कोरोना व्हायरस

स्ट्रोक

क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज

लंग कॅन्सर

अल्झायमर

मधुमेह

किडनीचा आजार

टीबी

एड्स

इस्केमिक हार्ट डिसीज म्हणजे काय?

इस्केमिक हार्ट डिसीजमध्ये रक्तप्रवाहाच्या कमतरतेमुळे हृदय कमकुवत होऊ लागतं. हा सहसा वाढलेल्या कोलेस्टेरॉलचा परिणाम असतो. नसांमध्ये प्लेक जमा झाल्यामुळे ब्लड सर्क्युलेशन योग्यरित्या होऊ शकत नाही. याने ग्रस्त असलेल्या व्यक्तीला छातीत दुखण्यापासून ते हार्ट अटॅकपर्यंतची लक्षणं देखील दिसू शकतात. त्याच्या उपचारांमध्ये औषधं, अँजिओप्लास्टी, सर्जरी आणि जीवनशैलीमध्ये आवश्यक बदल समाविष्ट आहेत. हृदय मजबूत करण्यासाठी, आहारासोबत व्यायाम करणं खूप महत्त्वाचं आहे.   

टॅग्स : हृदयरोगआरोग्यहेल्थ टिप्स