Winter Care Tips : थंडीला सुरूवात झाली की, थंडी लागणं ही सामान्य गोष्ट आहे. पण तुम्ही कधी लक्ष दिलंय का, काही लोकांना इतरांच्या तुलनेत जास्त थंडी का लागते? जर तुम्हालाही हात-पाय नेहमी थंड पडणे, सतत गारवा जाणवणे किंवा शहारे येणे अशी समस्या वाटत असेल, तर यामागे फक्त वातावरण कारणीभूत नसतं.
खरं तर शरीरात काही पोषक तत्त्वांची कमतरता खासकरून आयर्न आणि व्हिटामिन B12 यामुळेही शरीर तापमान नीट राखू शकत नाही आणि जास्त थंडी जाणवते. चला, हे का होतं आणि यापासून बचाव कसा करावा, ते जाणून घेऊ.
थंडी आणि पोषक तत्त्वांचा नेमका संबंध काय?
आपल्या शरीराचं तापमान टिकवून ठेवणं हे मुख्यपणे ब्लड सर्क्युलेशन आणि रेड ब्लड सेल्स यांच्या कार्यक्षमतेवर अवलंबून असतं. आयर्न आणि व्हिटामिन B12 हे दोन्हीही निरोगी रेड ब्लड सेल्स तयार करण्यासाठी आवश्यक असतात.
1) आयर्न
आयर्न हे हीमोग्लोबिन तयार करण्यासाठी महत्त्वाचं आहे. हीमोग्लोबिन शरीराच्या सर्व भागांपर्यंत ऑक्सिजन पोहोचवतं. आयर्न कमी पडल्यास हीमोग्लोबिन योग्य प्रमाणात तयार होत नाही. त्यामुळे अॅनिमिया होतो. शरीराला पुरेसं ऑक्सिजन न मिळाल्यानं उष्णता निर्माण कमी होते. आणि त्यामुळे नेहमी हात-पाय थंड राहणं, थंडी जास्त जाणवणं अशी लक्षणं दिसतात.
2) व्हिटामिन B12
व्हिटामिन B12 हेही रेड ब्लड सेल्स निर्माण, तसेच नर्व्हस सिस्टीमच्या कार्यासाठी आवश्यक आहे. B12 कमी पडल्यास मेगालोब्लास्टिक अॅनिमिया होतो, ज्यात RBCs मोठे, कमजोर आणि कार्यक्षम नसतात. त्यामुळे शरीरात ऑक्सिजनचा प्रवाह कमी होतो आणि मेटाबॉलिझम स्लो होतं, अशात शरीर पुरेशी उष्णता बनवू शकत नाही.
या कमतरतांची इतर लक्षणे
सतत थकवा, कमजोरी
त्वचा पिवळी पडणे
श्वास घेण्यास त्रास किंवा चक्कर येणे
हृदयाचे ठोके वाढणे
डोकेदुखी
केसगळती
बचावासाठी काय करावे?
1) आयर्नयुक्त आहार घ्या. पालक, ब्रोकली, बीट, डाळी, राजमा, सोयाबीन, मनुका, खजूर, अंजीर, तिळाचे व कोहळ्याच्या बिया यांचं सेवन करा.
आयर्न शोषण वाढवण्यासाठी
लिंबाचा रस, संत्री, कीवी, व्हिटामिन C आयर्न शोषण वाढवते जेवणानंतर लगेच चहा-कॉफी टाळा. कारण त्या आयर्नचे शोषण कमी करतात.
2) व्हिटामिन B12चे स्रोत
दूध, दही, पनीर, ताक यांसारखे डेअरी पदार्थ. शाकाहारींसाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने सप्लिमेंट्स घेता येतात.
3) नियमित तपासणी
जर तुम्हाला सतत थंडी जाणवणे, थकवा, कमजोरी असे लक्षणे दिसत असतील, तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. CBC सारख्या सध्या रक्त तपासणीने आयर्न आणि B12 दोन्हीची पातळी कळू शकते. आवश्यक असल्यास डॉक्टर सप्लिमेंट्स देतात.
