Thyriod Symptoms in Morning: सकाळी झोपेतून उठण्याचा कंटाळा अनेकांना येतो. पण जेव्हा झोपेतून उठता आणि थकवा जाणवतो, चेहऱ्यावर सूज दिसत असेल किंवा मूड स्वींग होत असेल तर हा केवळ आळस नाही. कदाचित आपलं शरीरात एखाद्या समस्येचा इशारा देत असेल. अनेकदा लोक सकाळी दिसणाऱ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतात आणि नंतर मोठी समस्या समोर येते. ही थायरॉइडची सुरूवातीची लक्षणं असू शकतात. जर आपल्याला सुद्धा सकाळी झोपेतून उठल्यावर या गोष्टी जाणवत असतील तर वेळीच सावध व्हायला हवं.
सकाळचा थकवा आणि सुस्ती
जर आपण रात्री ८ तास चांगली झोप घेतली असेल तरीही सकाळी थकवा जाणवत असेल, उठायची इच्छा होत नसेल आणि शरीर जड वाटत असेल तर हे हायपोथायरॉइडचं संकेत असू शकतात.
चेहरा आणि डोळ्यांवर सूज
सकाळी झोपेतून उठल्यावर चेहरा फुगलेला दिसत असेल किंवा डोळ्यांखाली सूज दिसत असेल तर याकडे दुर्लक्ष करू नका. हे थायरॉइडसंबंधी दिसणारं एक कॉमन लक्षण आहे.
केसगळती आणि त्वचा कोरडी पडणे
थायरॉइडची समस्या अशेल तर केसगळतीची समस्या होऊ लागते आणि त्वचा कोरडी व निर्जीव होते. खासकरून सकाळी आंघोळ करताना बदल स्पष्टपणे दिसून येतो.
मूड स्विंग आणि चिडचिडपणा
सकाळी विनाकारण राग येणं, विनाकारण निराश वाटणं किंवा कशातही लक्ष न लागणं, हे मानसिक थकव्याची लक्षणं असू शकतात. मानसिक थकवा थायरॉइडमध्ये बदल झाल्यामुळे येतो.
वजन कमी होणं किंवा वाढणं
विनाकारण अचानक वजन वाढणं किंवा कमी होणं थायरॉइडचा संकेत असू शकतो. जर सकाळी झोपेतून उठल्यावर भूक लागत नसेल किंवा जास्त लागत असेल तर वेळीच टेस्ट करावी.
हेल्दी लाइफस्टाईल फॉलो करा
सकाळी झोपेतून उठल्यावर जे संकेत दिसतात त्यांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. थायरॉइडचा आजार हळूहळू आतून शरीर कमजोर करतो. पण वेळीच जर याची माहिती मिळाली आणि योग्य उपचार घेतले तर याला कंट्रोल केलं जाऊ शकतं.