Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > शरीरात कशामुळे निर्माण होते आयर्नची कमतरता? वाचा ॲनिमियाची कारणं आणि उपाय

शरीरात कशामुळे निर्माण होते आयर्नची कमतरता? वाचा ॲनिमियाची कारणं आणि उपाय

Causes Of Iron Deficiency : आयर्नचं मुख्य काम म्हणजे हेल्दी ब्लड निर्माण करणं आणि ते हेल्दी ठेवणं. तसेच आयर्नची गरज हीमोग्लोबिन बनवण्यासाठीही होते. जे रेड ब्लड सेल्समध्ये आढळणारं एक प्रोटीन आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2024 16:36 IST2024-12-19T10:20:24+5:302024-12-19T16:36:32+5:30

Causes Of Iron Deficiency : आयर्नचं मुख्य काम म्हणजे हेल्दी ब्लड निर्माण करणं आणि ते हेल्दी ठेवणं. तसेच आयर्नची गरज हीमोग्लोबिन बनवण्यासाठीही होते. जे रेड ब्लड सेल्समध्ये आढळणारं एक प्रोटीन आहे.

These things can cause iron deficiency in the body | शरीरात कशामुळे निर्माण होते आयर्नची कमतरता? वाचा ॲनिमियाची कारणं आणि उपाय

शरीरात कशामुळे निर्माण होते आयर्नची कमतरता? वाचा ॲनिमियाची कारणं आणि उपाय

Causes Of Iron Deficiency: अनेकदा चिभेचे चोचले पुरवण्याच्या नादात आपण अशा काही गोष्टी खाल्ल्या जातात, ज्यामुळे शरीरात आयर्नची कमतरता होते. आयर्न एक खास मिनरल आहे जे शरीरातील अनेक महत्वाच्या क्रिया पार पाडण्यात मदत करतं. आयर्न मुख्य काम म्हणजे हेल्दी ब्लड निर्माण करणं आणि ते हेल्दी ठेवणं. तसेच आयर्नची गरज हीमोग्लोबिन बनवण्यासाठीही होते. जे रेड ब्लड सेल्समध्ये आढळणारं एक प्रोटीन आहे. याद्वारे शरीराच्या प्रत्येक कोपऱ्यात ऑक्सीजन पोहोचवण्याचं काम करतं. हे काम फार महत्वाचं असल्याने शरीरात आयर्नची कमतरता व्हायला नको.

आयर्न कमी झाल्यावर काय होतं?

शरीरात आयर्नची कमतरता झाल्याने टिश्यूज आणि इतर अवयवांना ऑक्सीजन असलेलं रक्त मिळत नाही. ज्यामुळे एनीमिया होण्याचा धोका वाढतो.

कशामुळे होते आयर्नची कमतरता?

पुरूष आणि महिला दोन्हीही या समस्येने पीडित होऊ शकतात. पण आयर्नची कमतरता जास्तकरून महिलांमध्ये बघायला मिळते. मासिक पाळीदरम्यान जास्त रक्तस्त्राव, भ्रूण किंवा बाळाच्या विकासाला सपोर्ट करण्यासाठी रक्त निर्माण करणं किंवा डिलिव्हरी दरम्यान जाणारं रक्त असो. त्याशिवाय आहारात आयर्न कमी असणे याचाही समावेश आहे.

आयर्नच्या कमतरतेची लक्षणं

जास्तीत जास्त केसेसमध्ये आयर्नची कमतरता झाल्याची हलकी लक्षणं दिसतात. जर आयर्न जास्तच कमी झालं तर एनीमियाचा धोका वाढतो. फिजिकल अॅक्टिविटी किंवा एक्सरसाईज दरम्यान थकवा, कमजोरी जाणवणे, चिडचिडपणा, डोकेदुखी, छातीत वेदना किंवा श्वास घेण्यास समस्या इत्यादी लक्षणे दिसतात.

आयर्न मिळवण्यासाठी काय खाल?

पालक, वेगवेगळ्या बीया, ड्राय फ्रूट्स, वेगवेगळ्या डाळी, सोयाबीन, शेंगदाणे, वेगवेगळी फळं, काळे तीळ खावेत.

काय काळजी घ्याल?

सामान्यपणे आयर्न भरपूर असलेल्या जेवणानंतर व्हिटॅमिन सी चं सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. ज्यामुळे शरीरात आयर्न अॅब्जॉर्ब केलं जातं. त्याशिवाय जंक फूड आणि फास्ट फूड टाळणं आरोग्यासाठी फायदेशीर असतं. 

Web Title: These things can cause iron deficiency in the body

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.