Diabetes or Thyroid Symptoms : पोटांसंबंधी समस्या अनेकांना नेहमीच होतात. पोट दुखणं, गॅस होणं या गोष्टींना सामान्य समजलं जातं आणि त्याकडे दु्र्लक्ष केलं जातं. पण जर पोटात नेहमीच गडबड राहत असेल तर हा एखादा गंभीर आजारही असू शकतो. काही केसेसमध्ये तर पोटाच्या या समस्यांमुळे डायबिटीस किंवा थायरॉइडचा धोकाही वाढतो. अशात या आजारांची लक्षणं काय असू शकतात हे पाहुयात.
बद्धकोष्ठता
जेव्हा पोटातील स्नायू योग्यपणे काम करत नाहीत, तेव्हा पचनक्रिया स्लो होते. त्यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास होतो. जर आपल्याला नेहमीच बद्धकोष्ठतेचा त्रास होत असेल ब्लड शुगर लेव्हल वाढलेली असू शकते. त्यासोबतच बद्धकोष्ठतेची समस्या थायरॉइडकडेही इशारा करते.
गॅस-अॅसिडिटी
गॅस आणि अॅसिडिटीचा त्रास अनेकांना नेहमीच होतो. याकडे सामान्य समस्या म्हणून अनेकदा दुर्लक्ष केलं जातं. पण जर हा त्रास नेहमीच होत असेल तर हा थायरॉइडचा संकेत असू शकतो. त्यामुळे वेळीच टेस्ट करून शहानिशा केली पाहिजे. इतकंच नाही तर ही समस्या डायबिटीसचं देखील लक्षण असू शकतं.
पोटात जडपणा, मळमळ
पोट जड वाटणं, मळमळ किंवा उलटी होणं या गोष्टीही सामान्य नाहीत. याकडे सामान्य समस्या म्हणून अजिबात पाहू नये. शरीरात दिसणारी ही सामान्य लक्षणं गंभीर आजारांकडे इशारा करू शकतात. हेच कारण आहे की, नियमितपणे यासंबंधी टेस्ट केल्या पाहिजे.