Who Should Not Drink Coconut Water: आजकाल वेगवेगळ्या फळांसोबत नारळ पाण्याची डिमांड खूप जास्त वाढली आहे. भरपूर लोक रोज नारळ पाणी पितात. नारळ पाणी आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानलं जातं. यातून शरीराला इलेक्ट्रोलाइट्स, व्हिटामिन्स आणि मिनरल्स मिळतात. एनर्जी मिळते आणि शरीर हायड्रेट राहतं. पण भरपूर फायदे असून सुद्धा काही लोकांसाठी नारळ पाणी पिणं नुकसानकारक ठरू शकतं. चला तर पाहुयात नारळ पाणी कुणासाठी ठरू शकतं नुकसानकारक...
किडनीचे रूग्ण
नारळ पाण्यात पोटॅशिअमचं प्रमाण अधिक असतं. जर आपल्याला किडनीसंबंधी काही समस्या असेल तर शरीर पोटॅशिअम योग्यपणे बाहेर काढू शकत नाही. ज्यामुळे हायपरकलेमिया होऊ शकतो. यात हृदयाचे ठोके असामान्य होतात आणि स्नायूंमध्ये कमजोरी जाणवू लागते.
लो ब्लड प्रेशरचे रूग्ण
नारळ पाण्यात ब्लड प्रेशर कमी करण्यास मदत मिळते. पण ज्यांचं ब्लड प्रेशर आधीच लो आहे, त्यांच्यासाठी नारळ पाणी नुकसानकारक ठरू शकतं. या लोकांना नारळ पाणी प्यायल्यावर चक्कर येणं, कमजोरी जाणवू शकते. तसेच ते बेशुद्ध सुद्धा पडू शकतात. अशात डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय नारळ पाणी पिऊ नये.
सर्जरीच्या आधी आणि नंतर
सर्जरीवेळी शरीराचं ब्लड प्रेशर संतुलित राहणं फार महत्वाचं असतं. पण नारळ पाण्यानं ब्लड प्रेशर प्रभावित होऊ शकतं, त्यामुळे सर्जरीच्या कमीत कमी दोन आठवड्यांआधी आणि नंतर हे न प्यायलेलंच बरं.
नारळाची अॅलर्जी
काही लोकांना नारळ किंवा त्यापासून बनवलेल्या पदार्थांची अॅलर्जी असते. अशात नारळ पाणी प्यायल्यावर रॅशेज, खाज, सूज आणि श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. जर नारळाची अॅलर्जी असेल तर नारळ पाणी पिणं टाळलं पाहिजे.
डायरिया किंवा पोटाची समस्या
नारळ पाण्यात लॅक्सेटिव्ह गुण असतात, जे पचन लवकर करतात. जर कुणाला डायरिया असेल, अपचन असेल किंवा इरिटेबल बाउल सिंड्रोम असेल तर नारळ पाण्यानं त्यांची समस्या वाढू शकते. त्यामुळे त्यांनी आधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.