Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > आरोग्यासाठी अमृत की विष? प्रत्येकासाठी फायदेशीर नाही गाजर-बीट ज्यूस; पिण्याआधी 'हे' वाचाच

आरोग्यासाठी अमृत की विष? प्रत्येकासाठी फायदेशीर नाही गाजर-बीट ज्यूस; पिण्याआधी 'हे' वाचाच

गाजर आणि बीटचा ज्यूस वेगवेगळा घेतात, पण एकत्र घेतल्यास शरीराला दुप्पट पोषण मिळतं. आधुनिक विज्ञान देखील याला 'नॅशनल ब्लड बूस्टर ड्रिंक' मानतं.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2026 16:39 IST2026-02-20T16:36:19+5:302026-02-20T16:39:09+5:30

गाजर आणि बीटचा ज्यूस वेगवेगळा घेतात, पण एकत्र घेतल्यास शरीराला दुप्पट पोषण मिळतं. आधुनिक विज्ञान देखील याला 'नॅशनल ब्लड बूस्टर ड्रिंक' मानतं.

these people should not drink beetroot carrot juice | आरोग्यासाठी अमृत की विष? प्रत्येकासाठी फायदेशीर नाही गाजर-बीट ज्यूस; पिण्याआधी 'हे' वाचाच

आरोग्यासाठी अमृत की विष? प्रत्येकासाठी फायदेशीर नाही गाजर-बीट ज्यूस; पिण्याआधी 'हे' वाचाच

हिवाळ्याच्या दिवसात गाजर आणि बीट मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात. यांचा वापर सॅलडपासून ते ज्यूसपर्यंत विविध प्रकारे केला जातो. गाजर आणि बीटच्या ज्यूसचे फायदे सर्वांनाच माहित आहेत, पण तुम्हाला माहित आहे का? जर या दोन्हीचा ज्यूस एकत्र करून प्यायल्यास शरीराला अगणित फायदे मिळतात. हे  शरीरासाठी एखाद्या अमृताप्रमाणे मानलं जातं.  पण हा ज्यूस प्रत्येकासाठी फायदेशीर नाही. 

आयुर्वेदानुसार, गाजर आणि बीटचा ज्यूस शरीराला ऊर्जा देणारा मानला जातो. हा ज्यूस केवळ दिसायलाच रंगीत नसतो, तर चव आणि पोषणानेही परिपूर्ण आहे. लोक सहसा गाजर आणि बीटचा ज्यूस वेगवेगळा घेतात, पण एकत्र घेतल्यास शरीराला दुप्पट पोषण मिळतं. आधुनिक विज्ञान देखील याला 'नॅशनल ब्लड बूस्टर ड्रिंक' मानतं. यामध्ये बीटा-कॅरोटीन, अँटी-ऑक्सिडंट्स, नायट्रेट आणि लोह वाढवणारे घटक असतात, जे त्वचा उजळण्यासाठी आणि रक्ताचे प्रमाण वाढवण्यासाठी प्रभावी ठरतात.

गाजर आणि बीटच्या ज्यूसचे फायदे

रक्तप्रवाह - गाजर आणि बीटमध्ये बीटा-कॅरोटीन, नायट्रेट आणि फोलेट असते, जे रक्तप्रवाह चांगला करतात आणि शरीरात व्हिटॅमिन सी शोषण्याची क्षमता वाढवतात.

लिव्हर डिटॉक्स - हा ज्यूस लिव्हरमधील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास (डिटॉक्स) मदत करतो. यामुळे लिव्हरची कार्यक्षमता वाढते आणि पित्ताचं संतुलन राखलं जातं.

त्वचा, डोळे आणि केसांचं आरोग्य - या ज्यूसमुळे शरीरातील व्हिटॅमिन ए चं प्रमाण वाढतं, जे डोळे आणि त्वचेसाठी फायदेशीर आहे. बीटमधील अँटी-ऑक्सिडंट्स फ्री-रॅडिकल डॅमेज कमी करतात, ज्यामुळे त्वचेचा कोरडेपणा कमी होतो.

या लोकांनी राहावं सावध

गाजर आणि बीटचा ज्यूस फायदेशीर असला तरी, सर्वांसाठीच तो योग्य नाही.

मधुमेह - मधुमेहाच्या रुग्णांनी हा ज्यूस टाळावा, कारण यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते.

किडनी स्टोन - ज्यांना किडनी स्टोनचा त्रास आहे, त्यांनी याचं सेवन टाळावं.

गर्भवती महिला आणि लो बीपी - गरोदर स्त्रियांनी आणि लो बीपी असलेल्या रुग्णांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच याचं सेवन करावं.
 

Web Title : गाजर-चुकंदर का जूस: सबके लिए नहीं! पीने से पहले ये पढ़ें।

Web Summary : गाजर-चुकंदर का जूस रक्त प्रवाह और लिवर डिटॉक्स जैसे फायदे देता है। मधुमेह, किडनी स्टोन, गर्भवती महिलाओं और लो बीपी वालों को सावधानी बरतनी चाहिए और सेवन से पहले डॉक्टर से सलाह लेनी चाहिए।

Web Title : Carrot-beet juice: Not for everyone! Read this before drinking.

Web Summary : Carrot-beet juice offers benefits like improved blood flow and liver detox. However, diabetics, kidney stone sufferers, pregnant women, and those with low BP should exercise caution and consult a doctor before consumption.