Join us
Daily Top 2 Weekly Top 5

तुमच्या रोज सकाळच्या ‘या’ सवयी किडनीसाठी सायलेंट किलर, पाहा कशामुळे किडनीचं होतंय नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2026 14:39 IST

Kidney Health : अनेकदा असं होतं की, किडनीसंबंधी एखादा आजार लक्षणांशिवायही हळूहळू वाढत असतो. त्यामुळे आपल्या रोजच्या सवयी कालांतराने किडनीचं मोठं नुकसान करतात.

Kidney Health : सामान्यपणे जास्तीत जास्त लोक सकाळी झोपेतून लवकर उठतात, चहा किंवा कॉफी पितात आणि दिवसाची सुरूवात करतात. पण सकाळी झोपेतून उठल्यावर किडनीबाबत कुणी फार विचार करत नाही. आपल्याला कल्पना नसेल, पण सकाळच्या छोट्या छोट्या सवयी आपल्या किडनीवर प्रभाव टाकू शकतात. किडनी शरीरातील विषारी तत्व बाहेर काढणे, पाण्याचं संतुलन ठेवणे आणि ब्लड प्रेशर कंट्रोल करण्याचं काम करतात. पण जर किडनीवर जास्त दबाव पडला किंवा शरीरातील पाणी कमी झालं तर हळूहळू त्याचं मोठं नुकसान होतं.

अनेकदा असं होतं की, किडनीसंबंधी एखादा आजार लक्षणांशिवायही हळूहळू वाढत असतो. त्यामुळे आपल्या रोजच्या सवयी कालांतराने किडनीचं मोठं नुकसान करतात. अशात सकाळच्या ५ अशा सवयी पाहुयात ज्या किडनीचं नुकसान करू शकतात.

सकाळी पाणी न पिणे

रात्रभर झोपल्यानंतर शरीरातील पाणी कमी होतं. यादरम्यान किडनी सतत काम करत असतात. जर आपण सकाळी पाणी पिण्याऐवजी चहा किंवा कॉफी पित असाल तर यामुळे किडनीवर दबाव पडतो. त्यामुळे सकाळी झोपेतून उठल्यावर एक ग्लास पाणी प्या. याने शरीरातील विषारी तत्व बाहेर पडतात आणि किडनी योग्यपणे काम करतात. जर पाण्याची कमतरता जास्त राहिली तर थकवा, डोकेदुखी आणि लघवी घट्ट होणे अशा समस्या होऊ शकतात.

जास्त वेळ लघवी रोखणे 

बरेच लोक सकाळी झोपेतून उठल्यावर वॉशरूमला जात नाही आणि लघवी रोखून ठेवतात. ही सवय बरोबर नाही. यामुळे ब्लॅडर आणि किडनीवर दबाव पडतो. पुन्हा पुन्हा असं करत असाल तर इन्फेक्शनचा धोकाही वाढतो. तसेच ब्लड प्रेशर देखील प्रभावित होतं. त्यामुळे सकाळी झोपेतून उठल्यावर लघवीला जावं.

उपाशीपोटी औषध घेणे

बरेच लोक सकाळी सकाळी पेनकिलर घेतात. उपाशीपोटी औषध घेतल्याने ते वेगाने रक्तात मिसळतं आणि यामुळे किडनीवर दबाव पडतो. जास्त काळ डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय पेनकिलर घेतल्यास किडनीचं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे औषध नेहमीच काही खाल्ल्यावर घ्यावं.

एक्सरसाईजनंतर पाणी न पिणे

सकाळी वर्कआउट करणं चांगलं असतं, पण यादरम्यान आलेल्या घामामुळे शरीरात पाणी आणि आवश्यक मिनरल्स कमी होतात. अशात जर आपण वर्कआउटनंतर पाणी पित नसाल किंवा इलेक्ट्रोलाइट्स घेत नसाल तर डिहायड्रेशनची समस्या होऊ शकते. याचाही किडनीवर प्रभाव पडतो. 

नाश्ता न करणे

नाश्ता न करणं सुद्धा किडनीसाठी नुकसानकारक ठरू शकतं. नाश्ता न केल्यास दिवसा जास्त मीठ किंवा जंक फूड खाण्याची इच्छा होते. ज्यामुळे किडनीवर दबाव पडतो. जास्त मिठामुळे ब्लड प्रेशर वाढतं आणि किडनीचं नुकसान होतं. त्यामुळे सकाळी नाश्ता आवर्जून करावा. नाश्त्यात हेल्दी गोष्टी खाव्यात.

English
हिंदी सारांश
Web Title : Morning habits can be silent killers for your kidneys: Beware!

Web Summary : Skipping water, holding urine, and taking medicine on an empty stomach damages kidneys. Avoid dehydration after exercise and skipping breakfast. These habits gradually harm kidney health.
टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्य