Join us

थंडीत सतत सर्दी-खोकल्याचा संसर्गच होणार नाही, आहारात रोज खा ‘या’ गोष्टी, थंडीत तब्येत ठणठणीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2025 15:59 IST

Healthy Foods in Winter : यांचा फायदा असा होईल की, थंडीच्या दिवसातील थंड हवेमुळे आपण आजारी पडणार नाही. या गोष्टी हिवाळ्यात एखाद्या औषधीसारखं काम करतात.

Healthy Foods in Winter : थंडीच्या दिवसातील गारव्यापासून बचाव करण्यासाठी जास्तीत जास्त लोक वुलनचे कपडे वापरतात. तर बरेच लोक दिवसभर कित्येक चहा पितात. याने शरीर गरम राहतं. त्यासोबतच असेही काही पदार्थ आहेत ज्यांचा वापर करून शरीर थंडीच्या दिवसात आतून गरम ठेवतात. हे पदार्थ खाऊन थंडी जाणवणार नाही. याचा फायदा असा होईल की, थंडीच्या दिवसातील थंड हवेमुळे आपण आजारी पडणार नाही. या गोष्टी हिवाळ्यात एखाद्या औषधीसारखं काम करतात.

लसूण

लसणाने पदार्थांची टेस्ट तर वाढतेच, सोबतच यातील औषधी गुणांमुळे आरोग्यालाही अनेक फायदे मिळतात. एक्सपर्ट हिवाळ्यात कच्चा लसूण खाण्याची आवर्जून सल्ला देतात. यामुळे शरीराला पोषण मिळतं, इम्यूनिटी वाढते, इन्फेक्शनपासून बचाव होतो, बद्धकोष्ठताही होईल दूर होईल.

गूळ

हिवाळ्यात गूळ खाणं फार फायदेशीर ठरतं. कारण गूळ हा गरम असतो. अशात सर्दी-खोकला अशा समस्या दूर होतात. गूळ तुम्ही असाही खाऊ शकता. तसेच गुळाचा चहा प्या किंवा लाडू वा चिक्की खाऊ शकता.

हिरवी मिरची

तिखट हिरवी मिरची खाल्ल्याने शरीरात उष्णता निर्माण होते. मिरचीचा तिखटपणा शरीराचं तापमान वाढवतो. ज्याने आतून गरम वाटतं. त्यामुळे थंडी दूर करण्यासाठी तुम्ही हिवाळ्यात हिरव्या तिखट मिर्च खाऊ शकता.

ड्राय फ्रूट्स

ड्राय फ्रूट्स जसे की, बदाम, खजूर, मनुके इत्यादी खाऊन तुम्ही शरीर आतून गरम ठेवू शकता. यातील पोषक तत्व जसे की, व्हिटामिन ई, बी कॉम्प्लेक्स, मॅग्नेशिअम, कॉपर, झिंक, कॅल्शिअम आणि इतरही हेल्दी प्रोटीन असतात. जे आरोग्यासाठी फायदेशीर असतात.

आले

आल्याचा गुणधर्म हा उष्ण असतो. हिवाळ्यात छोट्या छोट्या समस्या जसे की, खोकला, सर्दी-पडसा, घशात खवखव, इन्फेक्शन, ताप इत्यादी दूर करण्यासाठी तुम्ही आल्याचे सेवन करू शकता. अनेकजण या दिवसात आल्याचा चहाही सेवन करतात. 

हळद

हळदीचा वापर केल्याने तुम्ही अनेक रोगांपासून आणि इन्फेक्शनपासून बचाव करू शकता. आयुर्वेदातही हळदीला फार महत्त्व देण्यात आलं आहे. गरम दुधात अर्धा चमचा हळद टाकून प्यायल्याने तुम्हाला गरम वाटेल आणि इन्फेक्शनपासूनही तुमचा बचाव होईल.

English
हिंदी सारांश
Web Title : Eat these foods daily to avoid winter cold and cough.

Web Summary : To stay healthy in winter, consume garlic, jaggery, green chilies, dry fruits, ginger, and turmeric. These warm the body, boost immunity, and prevent infections.
टॅग्स : थंडीत त्वचेची काळजीहेल्थ टिप्सआरोग्य