Join us

सतत गॅसेस होण्याची समस्या होईल चटकन कमी, पाहा ‘हे’ घरगुती उपाय- पचनही सुधारेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2025 16:04 IST

Home Remedies For Stomach Gas : पोटात जळजळ होण्याची आणि गॅसची समस्या दूर करण्यासाठी आम्ही तुम्हाला काही घरगुती उपाय सांगणार आहोत, ज्यांनी तुम्हाला लगेच आराम मिळेल.

Home Remedies For Stomach Gas : आजकाल लोकांना बाहेरची खाण्याची सवय खूप जास्त लागली आहे. कामासाठी बाहेर पडले असता जास्तीत जास्त लोक घरचं सोडून बाहेरचंच खातात. ज्यामुळे अपचन, अॅसिडिटी, ब्लोटिंग अशा समस्या होतात. यात आणखी एक नेहमीच होणारी समस्या म्हणजे गॅस. पोटात गॅस तयार झाल्यानं अस्वस्थ वाटतं. पोटदुखतं आणि फुगतं सुद्धा. छातीत पोटात जळजळ वाटण्याची समस्याही वाढते. अशात पोटात जळजळ होण्याची आणि गॅसची समस्या दूर करण्यासाठी आम्ही तुम्हाला काही घरगुती उपाय सांगणार आहोत, ज्यांनी तुम्हाला लगेच आराम मिळेल.

जेवण झाल्यावर खा गूळ

जर तुम्हाला पोटात जळजळ होण्याची समस्या होत असेल तर रोज जेवण झाल्यावर थोडा गूळ चघळायला हवा. गूळ चाऊन खाऊ नका. जितका जास्त तुम्ही गूळ चघळाल तितका जास्त फायदा होईल. याने पचनक्रियेची क्षमता वाढते आणि पोटाची जळजळ होण्याची समस्याही दूर होते.

टोमॅटो आणि संत्री

पोटात होणारी जळजळ दूर करण्यासाठी टोमॅटो फायदेशीर ठरतं. कच्चा टोमॅटोचा आहारात समावेश करा. याने अ‍ॅसिडिटी आणि पोटाची जळजळ लगेच दूर होईल. टोमॅटोमुळे शरीरातील क्षारचं प्रमाण वाढतं. ठिक असंच काम संत्री करतात. 

आल्याचा रस

आल्याचा रस सुद्धा पोटातील जळजळ आणि गरम वाटणं दूर करतो. लिंबाचा रस, मध आणि आल्याचा रस पाण्यात एकत्र करुन सेवन करा. याने पोट शांत होईल. आल्यामध्ये अ‍ॅंटी बॅक्टेरिअल गुणही असतात त्यामुळे पोटातील हानिकारक बॅक्टेरिया सुद्धा नष्ट होतात. 

बडीशेपेचं पाणी

१ कप उकडलेल्या पाण्यात एक चमचा बडीशेप मिश्रित करुन रात्रभर तसंच ठेवा. सकाळी हे मिश्रण गाळून त्यात एक चमचा मध टाकून सेवन करा. हे मिश्रण दिवसातून तीन वेळा घ्या. याने पोटाची जळजळ, अ‍ॅसिडिटीची समस्या दूर होईल. तसेच पोट फुगणे आणि गॅसची समस्याही दूर होईल. 

ओवा

एका पॅनमध्ये ओवा भाजून त्याची पावडर तयार करा. यात थोडं काळं मीठ मिश्रित करा. हे जेवण केल्यावर कोमट पाण्यासोबत सेवन करा. याने पोटाची जळजळ आणि अ‍ॅसिडिटी दूर होईल. ओव्यात थायमॉल आणि काळ्या मिठात अल्केलाइड्स असतात. याने अ‍ॅसिडिटी दूर होते.   

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्य