Join us

पालक पनीर चवीला छान पण तब्येतीसाठी मात्र घातक, पावसाळ्यात तर हमखास बिघडते पोट कारण..

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2025 14:51 IST

Health Tips : पालकासोबत चुकीचं कॉम्बिनेशन केलं गेलं तर पचनासंबंधी वेगवेगळा त्रास होऊ शकतो.

Health Tips : पालेभाज्यांचं नाव निघालं की, सगळ्यांच्या डोळ्यांसमोर आधी येते ती पालक. पालक जवळपास प्रत्येक घरांमध्ये एक दिवसआड किंवा आठवड्यातून ३ ते ४ वेळा खाल्ली जाते. पालक आणि डाळ तर सर्रासपणे खातात. इतकंच नाही तर बरेच लोक पालकाचे पराठे, पालकाची सुकी भाजी आणि भजीही खातात. आणखी एक फेमस डिश म्हणजे पालक पनीर. पालक पनीर हॉटेल्समध्ये खाल्ली जाणारी सगळ्यात फेमस भाजी असेल असं म्हटलं तर वावगं ठरू नये. लोक मोठ्या आनंदानं ही भाजी खातात. 

पालक ही एक भरपूर पौष्टिक तत्व असणारी पालेभाजी आहे. यातून शरीराला भरपूर आयर्न मिळतं. वेगवेगळे व्हिटामिन्स आणि अ‍ॅंटी-ऑक्सीडेंट्सही मिळतात. इतकंच नाही तर पालकाची टेस्टही चांगली लागते. पण इतके फायदे असूनही ही भाजी जर कशासोबत मिक्स केली तर या भाजीतील पोषक तत्व कमी होतात. अनेक हेल्थ एक्सपर्ट पालक कोणत्या गोष्टींसोबत मिक्स करून खाऊ नये याबाबत सांगत असतात. तेच पाहुयात.

हेल्थ एक्सपर्ट सांगतात की, पालकासोबत चुकीचं कॉम्बिनेशन केलं गेलं तर पचनासंबंधी वेगवेगळा त्रास होऊ शकतो. त्यामुळे खालील काही गोष्टी पालकासोबत चुकूनही न खाण्याचा सल्ला एक्सपर्ट देतात.

पालक-पनीर 

पालकामध्ये आयर्न भरपूर असतं. तर पनीरात कॅल्शिअम असतं. पालकामध्ये पनीर मिक्स झाल्यावर कॅल्शिअम आयर्न अ‍ॅब्जॉर्प्शन रोखतं. ज्यामुळे शरीराला पुरेसं आयर्न मिळत नाही. त्यामुळे ज्यांच्या शरीरात आयर्न कमी आहे, जसे की गर्भवती महिला त्यांनी पालक पनीर खाणं नुकसानकारक ठरू शकतं.

पालक आणि दही

पनीरसारखं दह्यामध्ये सुद्धा कॅल्शिअम असतं. तर पालकात आयर्न असतं. दोन्ही गोष्टी एकत्र झाल्या तर पोटासंबंधी वेगवेगळ्या समस्या होऊ शकतात. त्यामुळे पालक, दही कधीच एकत्र खाऊ नये.

पालक आणि डेअरी प्रॉडक्ट्स

एक्सपर्ट सांगतात की, पालकासोबत पनीर, दूध इत्यादी गोष्टी मिक्स करत असाल तर आयर्न अ‍ॅब्जॉर्प्शनमध्ये अडथळा निर्माण होतो. ज्यामुळे ब्लोटिंग, अ‍ॅसिडिटी, छातीत जळजळ या समस्या होतात. 

पालक आणि बदाम किंवा अक्रोड

जर एखादी अशी भाजी बनवत असाल ज्यात पालकसोबत बदाम किंवा अक्रोड टाकायचं आहे तर ही भाजी नुकसानकारक ठरू शकते. कारण बदाम किंवा अक्रोडमधील फायटेंट्स आणि कॅल्शिअम पालकमधील आयर्न व मिनरल्सच्या अ‍ॅब्जॉर्प्शनमध्ये अडथळा निर्माण करतात. 

टोमॅटो किंवा आंबट पदार्थ

जर पालकमध्ये टोमॅटोही मिक्स करू नये. कारण टोमॅटोतील ऑक्सालेट रिव्हर्स रिअ‍ॅक्ट करतं. ज्यामुळे पालकातील आयर्न आणि व्हिटामिन्सचे फायदे मिळण्याऐवजी अ‍ॅसिडिटी, ब्लोटिंगची समस्या होते.

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्स