Join us

आला हिवाळा, आरोग्य सांभाळा; 'या' आजारांचा सर्वाधिक धोका, लक्षणं दिसताच व्हा सावध

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2024 18:48 IST

हिवाळ्यात आरोग्याची जास्त काळजी घेणं गरजेचं आहे. चुकीच्या जीवनशैलीमुळे आजकाल आरोग्यविषयक अनेक समस्या वेगाने वाढत आहेत.

हिवाळ्यात आरोग्याची जास्त काळजी घेणं गरजेचं आहे. चुकीच्या जीवनशैलीमुळे आजकाल आरोग्यविषयक अनेक समस्या वेगाने वाढत आहेत. यापैकीच एक म्हणजे युरिक ॲसिडची समस्या. हिवाळ्यात चहा, कॉफी आणि इतर खाद्यपदार्थांचं सेवन जास्त केलं जातं, तसेच शारीरिक हालचालीही कमी होतात, त्यामुळे बीपी, शुगरपासून ते युरिक ॲसिडपर्यंतच्या समस्या वेगाने वाढू लागतात.

हिवाळ्यात हाय प्रोटीनयुक्त आहार आणि कमी पाणी प्यायल्यामुळे देखील यूरिक ॲसिड वाढतं, ज्यामुळे किडनी खराब होते आणि हृदयाच्या समस्या किंवा स्ट्रोक होऊ शकतो. अशा स्थितीत हिवाळ्यात कोणत्या समस्यांचा धोका सर्वाधिक असतो, तसेच युरिक ॲसिडच्या समस्येवर कसं नियंत्रण ठेवायचं हे जाणून घेऊया...

हिवाळ्यात 'या' आजारांचा वाढतो धोका 

- किडनी स्टोन - हाय यूरिक ॲसिड  - मधुमेह - हृदयरोग - स्ट्रोक - संधिवात

सायलेंट हार्ट अटॅकची लक्षणं

- छातीत जळजळ  - अपचन - पाठदुखी - खूप थकवा - वारंवार श्वास घेण्यात अडचण - अस्वस्थता

हाय यूरिक ॲसिडची लक्षणं

- पाय दुखणे - सूज येणे - सांधेदुखी - हाता-पायाला मुंग्या येणं

युरिक ॲसिड कसं करावं कंट्रोल?

आजच्या काळात अनेक लोक युरिक ॲसिडच्या समस्येने त्रस्त आहेत, अशा परिस्थितीत काही गोष्टींचं सेवन करणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतं. जर तुम्हालाही युरिक ॲसिडचा त्रास होत असेल तर तुम्ही एप्पल व्हिनेगर, दुधीचा रस, हिरव्या भाज्या, ओवा आणि अळशीचं सेवन करू शकता. तसेच ताक, हरभरा, मुळा यांचाही आहारात समावेश करू शकता.  

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्यथंडीत त्वचेची काळजी