15 minutes healthy habits : सकाळी झोपेतून उठल्यापासून रात्र होईपर्यंत फक्त काम आणि टेंशन फारच कॉमन झालं आहे. ज्यामुळे वेगवेगळे आजार कमी वयातच जडतात. अशात फिट राहण्यासाठी बरेच लोक जिमसाठी भरपूर पैसे खर्च करतात. पण मुळात रोज जर काही गोष्टींसाठी केवळ १५ मिनिटं दिली तर आपण मानसिकरित्या आणि शारीरिकरित्याही निरोगी राहू शकतो. अशात जाणून घेऊया की, रोज १५ मिनिटं कोणती कामं करून आपण निरोगी राहू शकतो.
पहिलं काम
सकाळी झोपेतून उठल्यानंतर डोळे बंद करा आणि मोठा श्वास घ्या व हळूहळू बाहेर सोडा. ही प्रक्रिया १५ मिनिटं करा. असं केल्याने मेंदूला भरपूर ऑक्सिजन मिळतं आणि स्ट्रेस हार्मोन कार्टिसोलचं प्रमाणही कमी होतं. ज्यामुळे तणाव-चिंता दूर होते.
दुसरं काम
बिझी शेड्युलमुळे, प्रवासामुळे अनेकांकडे वर्कआउट करायला वेळ नसतो किंवा अनेकांना वर्कआउटचा कंटाळा येतो. अशांनी दुपारच्या जेवणानंतर किंवा सायंकाळी १५ मिनिटं फास्ट वॉक करावा. याने पचन तंत्र तर मजबूत होतंच, सोबतच हृदय देखील फिट राहतं. तसेच रोज १५ मिनिटं वॉक केल्याने मूडही फ्रेश राहतो.
तिसरं काम
हल्ली फोनचा वापर खूप जास्त वाढला आहे. असंही म्हणू शकतो की, फोनचं व्यसन लागलं आहे. सतत फोन बघणं डोळ्यांसाठी आणि मेंदूसाठी घातक असतं. अशात रोज किमान १५ मिनिटं फोनपासून दूर राहण्याची सवय लावा. याला डिजिटल डिटॉक्स असं म्हणतात. या १५ मिनिटांमध्ये आपण इतरही काही छोटी छोटी कामे करू शकता. ज्याने डोक्याला आणि डोळ्यांना आराम मिळेल.
चौथं काम
रोज १५ मिनिटं आपल्या आवडीची गाणी ऐका किंवा आवडीचं पुस्तक वाचा. अनेक संशोधनातून हे समोर आलं आहे की, संगीत ऐकल्याने डोपामाइन हार्मोन रिलीज होतात. या हार्मोनने आनंद मिळतो. थकवा लगेच गायब होतो.
पाचवं काम
दिवसभरातून केवळ १५ मिनिटं किंवा एखाद्या जवळच्या मित्रासोबत आपल्या मनातील गोष्टी बोला. हसल्याने, मन मोकळं केल्याने इम्यून सिस्टीम मजबूत होतं आणि आपल्याला आतून आनंदी असल्याची जाणीव होते.
फार काही मेहनतीचं काम न करताही या छोट्या छोट्या गोष्टी जर रोज ठरवून केल्या तर नक्कीच आपलं मन आणि शरीर दोन्ही निरोगी राहू शकतात. आपल्याच आरोग्यासाठी आपण किमान इतका तरी वेळ काढू शकतोच.
Web Summary : Incorporate five simple habits into your daily routine for a healthier life. These include mindful breathing, walking, digital detox, listening to music, and connecting with loved ones. Dedicate just fifteen minutes to each activity to reduce stress, boost immunity, and improve overall well-being, both mentally and physically.
Web Summary : स्वस्थ जीवन के लिए अपनी दिनचर्या में पाँच सरल आदतें शामिल करें। इनमें सचेत श्वास, चलना, डिजिटल डिटॉक्स, संगीत सुनना और प्रियजनों के साथ जुड़ना शामिल है। तनाव कम करने, प्रतिरक्षा बढ़ाने और मानसिक और शारीरिक रूप से समग्र कल्याण में सुधार के लिए प्रत्येक गतिविधि को केवल पंद्रह मिनट समर्पित करें।