शरीराला व्यवस्थित काम करण्यासाठी अनेक व्हिटामीन्स आणि मिनरल्सची आवश्यकता असते. शरीराला सगळ्यात जास्त गरजेचं असलेले व्हिटामीन म्हणजे व्हिटामीन बी-१२. हे व्हिटामीन लाल रक्ताच्या पेशी तयार करण्यासाठी हार्ट हेल्थ चांगली ठेवण्यासाठी गरजेचे असतं. व्हिटामीन्सच्या कमतरतेमुळे चालणं-फिरणंसु्द्धा कठीण होऊ शकतं.अन्हेल्दी चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयींमुळे दिवसेंदिवस व्हिटामीन बी-१२ ची कमतरता लोकांच्या शरीरात वाढत चालली आहे. (These are the symptoms of vitamin B-12 deficiency Eat 5 vegetarian foods get B-12 at a low cost)
एम्सचे माझी कंसल्टेंट आणि डायरेक्टर डॉ. बिमल झांजर यांच्यामते शरीरात व्हिटामीन बी-१२ ची कमी असेल तर शरीराच्या कार्यक्षमतेवर परीणाम होतो. थकवा येणं, भूक न लागणं अशा समस्या उद्भवतात. याशिवाय गंभीर मानसिक आणि पचनासंबंधी समस्या उद्भवू शकतात. वेळी उपचार न केल्यास तब्येतीवर गंभीर परीणाम होऊ शकतात.
गॅस आणि अपचन
व्हिटामीन बी-१२ ची कमतरता पचनक्रियेवर परीणाम करते. ज्यामुळे खाल्लेल्या अन्नाचं व्यवस्थित पचन होत नाही. जेवण केल्यानंतर पोट जास्त भरलेलं वाटतं.
भूक कमी होते
जेव्हा शरीरात आहारातून पूर्ण पोषण मिळत नाही तेव्हा भूक कमी होते काहीही खाण्याची इच्छा होत नाही. हे व्हिटामीन बी-१२ च्या कमतरतेचं लक्षण आहे.
पायांमध्ये सूज
व्हिटामीन बी-१२ च्या कमतरतेमुळे पायांमध्ये जळजळ, वेदना, सूज अशा समस्या उद्भवतात. अनेकदा जळजळ, एसिडीटी होते.
उलट्या
व्हिटामीन बी-१२ ग्रस्त लोकांना पोटात जड वाटणं, उलट्या होणं अशी समस्या उद्भवते. तुम्हालाही असा त्रास होत असेल तर एकदा ब्लड टेस्ट नक्की करा.
व्हिटामीन बी-१२ ची कमतरता पू्र्ण करण्यासाठी काय खावं?
व्हिटामीन बी १२ ची कमतरता शाकाहारी लोकांमध्ये खूपच कॉमन आहे. हे व्हिटामीन मुख्य स्वरूपात पशू उत्पादनांमधून प्राप्त होते. दूध, पनीर,दही यांसारख्या पदार्थांचा आहारात समावेश करून तुम्ही व्हिटामीन बी-१२ ची कमतरता भरून काढू शकता. याशिवाय सफरचंद, संत्री, केळी, किव्ही अशी फळं खा,पालेभाज्या जसं की कोलार्ड, पनीर पालकचे सेवन करा.