High cholesterol symptoms : अनहेल्दी पदार्थ खाणं, सुस्त लाइफस्टाईल, एकाच जागी जास्त वेळ बसून राहणं, तेलकट, मसालेदार पदार्थ खाणं यामुळे अलिकडे भरपूर लोक वाढलेल्या कोलेस्टेरॉलनं पीडित आहेत. जर वेळीच कोलेस्टेरॉल नियंत्रित केलं नाही तर हृदयासांबंधी वेगवेगळ्या गंभीर आजारांचा धोका वाढतो. कोलेस्टेरॉलचं प्रमाण जर शरीरात वाढलं असेल तर शरीर याचे काही संकेत देतं. कोलेस्टेरॉल वाढल्याचे काही संकेत डोळ्यांमध्येही दिसतात. तेच पाहुयात जेणेकरून आपल्याला वेळीच उपचार घेता येतील.
जॅंथेलास्मा
हेल्थ एक्सपर्ट्स सांगतात की, जेव्हा शरीरात कोलेस्टेरॉल वाढतं, तेव्हा याची लक्षणं डोळ्यांमध्येही दिसतात. डोळ्यांच्या आजूबाजूला जॅंथेलास्मा होऊ शकतो. डोळ्यांच्या आजूबाजूला किंवा पापण्यांवर पिवळ्या रंगाचे डाग किंवा पुरळ दिसत असेल तर त्याला जॅंथेलास्मा म्हटलं जातं. हे शरीरात कोलेस्टेरॉल वाढल्याचं एक लक्षण आहे.
धुसर दिसणे
जर आपल्याला कमी वयातच डोळ्यांनी धुसर दिसत असेल तर याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. शरीरातील हाय कोलेस्टेरॉलमुळे दृष्टीवर नकारात्मक प्रभाव पडतो. त्याशिवाय आर्कस सेनिलिस म्हणजे आयरिसच्या चारही बाजूंनी एक व्हाइट किंवा ब्लू रिंग दिसते. हेही कोलेस्टेरॉल वाढण्याकडे इशारा करते.
हाय कोलेस्टेरॉल किती घातक?
हाय कोलेस्टेरॉलची समस्या आरोग्याासाठी खूप जास्त घातक आहे. अलिकडे भरपूर लोकांना ही समस्या होते. ज्यामुळे जीवालाही धोका होतो. कोलेस्टेरॉल जर वाढलं असेल आणि ते वेळीच नियंत्रित केलं नाही तर हार्ट अॅटॅक किंवा स्ट्रोकचा धोका असतो. कोलेस्टेरॉलचं प्रमाण जाणून घेण्यासाठी लिपिड प्रोफाइल टेस्ट करा. तसेच कोलेस्टेरॉल कंट्रोल ठेवण्यासाठी लाइफस्टाईल आणि डाएटमध्ये बदल करा.