Super food for Heart : जगभरात सगळ्यात जास्त मृत्यू हृदयरोगांमुळे होतात. जगभरातील लोक आपल्या लाइफस्टाईलसंबंधी काही चुकांमुळे वेगवेगळ्या हृदयरोगांचे शिकार होत आहेत. कुणाचा बीपी हाय असतो, कुणाचा बीपी लोक असतो. कुणाचं बॅड कोलेस्टेरॉल वाढलेलं असतं. ज्यामुळे मृत्यूचा धोकाही वाढलेला असतो. अशात हृदयाची काळजी घेणं आणि त्यानुसार डाएटचा विचार करणं खूप गरजेचं ठरतं. जेणेकरून हृदयरोगांचा धोका (Heart Disease) टाळता यावा.
अलिकडेच समोर आलेल्या एका रिपोर्टनुसार, पोटॅशिअमनं(Potassium-Rich Diet) हार्ट फेल आणि हृदयासंबंधी आजारांचा धोका कमी करण्यास मदत मिळू शकते. हा रिसर्च न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसीनमध्ये प्रकाशित करण्यात आला आहे. ज्यातून असं समोर आलं की, डाएटमध्ये जर पोटॅशिअमचा समावेश केला तर हृदयासंबंधी गंभीर आजारांचा धोका बराच कमी केला जाऊ शकतो.
पोटॅशिअमचं महत्व
या रिसर्चमधून हे स्पष्ट होतं की, पोटॅशिअम असलेल्या फूड्सचा आपल्या आहारात समावेश करणं हृदयासाठी फायदेशीर ठरू शकतं. कारण पोटॅशिअम इलेक्ट्रोलाइट्समध्ये बॅलन्स ठेवण्यास, नर्व सिग्नल्स, स्नायू तयार करण्यास आणि ब्लड प्रेशर कंट्रोल करण्यास मदत करतं. ज्यामुळेच हृदय निरोगी राहतं.
कशातून मिळेल पोटॅशिअम?
केळी
केळींमध्ये भरपूर पोटॅशिअम असतं. सामान्यपणे एका मध्यम आकाराच्या केळ्यात जवळपास 422 mg पोटॅशिअम असतं. तसेच यात इतरही असे अनेक पोषक तत्व असतात, जे हृदयासाठी आणि एकंदर आरोग्यासाठी फायदेशीर असतात. त्यामुळे नियमितपणे केळी खाल्ली पाहिजेत.
रताळी
रताळी सुद्धा पोटॅशिअमचा मोठा स्त्रोत असतात. तसेच यात फायबर आणि व्हिटामिन ए सुद्धा असतं. ज्यामुळे हे कंदमूळ हृदयासाठी सुपरफूड ठरतं.
पालक
हिरव्या पालेभाज्यांमध्ये पालक सगळ्यात शक्तीशाली मानली जाते. यात पोटॅशिअम सुद्धा भरपूर असतं. एक कप शिजलेल्या पालकात जवळपास 312 mg पोटॅशिअम असतं. त्यामुळे नियमितपणे पालक खा.
अॅवोकाडो
अॅवोकाडो हे एक भन्नाट टेस्टी आणि आरोग्यासाठी फायदेशीर असं फळ आहे. यात इतर पोषक तत्वांसोबतच पोटॅशिअम सुद्धा भरपूर असतं. एका अॅवोकाडोमध्ये जवळपास 1000 mg पोटॅशिअम असतं.
नारळाचं पाणी
नारळाचं पाणी खूप पौष्टिक असतं. यात भरपूर नॅचरल इलेक्ट्रोलाइट्स असतात. यानं शरीर हायड्रेट राहतं. तसेच शरीराला पोटॅशिअम सुद्धा मिळतं.
दही
दह्यात प्रोबायोटिक्स आणि पोटॅशिअम दोन्ही तत्व भरपूर असतात. एक वाटी दह्यात जवळपास 579 mg पोटॅशिअम असतं. त्यामुळे दही नेहमीच खाल्लं पाहिजे. पोटॅशिअम हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतं. पण हे जास्त प्रमाणात घेऊ नये. ज्यांना किडनीसंबंधी समस्या आहे, त्यांच्यासाठी याचं जास्त प्रमाण नुकसानकारक ठरतं.