Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > रोज दोनदा ब्रश करूनही तोंडाला दुर्गंधी येते? काही व्हिटामिन्सची कमतरता असू शकतं कारण...

रोज दोनदा ब्रश करूनही तोंडाला दुर्गंधी येते? काही व्हिटामिन्सची कमतरता असू शकतं कारण...

Bad Breath Causes : जाणून घेऊया कोणत्या व्हिटामिन्सच्या कमतरतेमुळे तोंडातून दुर्गंधी येऊ शकते आणि त्यावर काय उपाय करता येतील.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2026 17:31 IST2026-01-17T09:12:31+5:302026-01-17T17:31:13+5:30

Bad Breath Causes : जाणून घेऊया कोणत्या व्हिटामिन्सच्या कमतरतेमुळे तोंडातून दुर्गंधी येऊ शकते आणि त्यावर काय उपाय करता येतील.

These 5 vitamin deficiencies can be the reason behind bad breathe | रोज दोनदा ब्रश करूनही तोंडाला दुर्गंधी येते? काही व्हिटामिन्सची कमतरता असू शकतं कारण...

रोज दोनदा ब्रश करूनही तोंडाला दुर्गंधी येते? काही व्हिटामिन्सची कमतरता असू शकतं कारण...

Bad Breath Causes : तोंडातून येणारी दुर्गंधी ही केवळ पचनाच्या समस्या किंवा दातांची स्वच्छता न राखल्यामुळेच होते असे नाही. अनेक वेळा ही समस्या शरीरातील आवश्यक व्हिटामिन्सच्या कमतरतेचे संकेत देत असते. योग्य वेळी याची कारण ओळखली तर ही अडचण सहज दूर करता येऊ शकते. चला तर जाणून घेऊया कोणत्या व्हिटामिन्सच्या कमतरतेमुळे तोंडातून दुर्गंधी येऊ शकते आणि त्यावर काय उपाय करता येतील.

तोंडाच्या दुर्गंधीशी संबंधित व्हिटामिन्सची कमतरता

व्हिटामिन C ची कमतरता

व्हिटामिन C हे हिरड्या आणि दातांच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. याची कमतरता झाल्यास हिरड्यांना सूज येणे, रक्तस्राव होणे आणि बॅक्टेरियाची थर जमा होऊ लागतो. त्यामुळे तोंडातून दुर्गंधी येऊ शकते.

व्हिटामिन D ची कमतरता

व्हिटामिन D हाडे आणि दात मजबूत ठेवण्याचे काम करते. याची कमतरता असल्यास दात कमकुवत होतात, लवकर सडतात आणि हिरड्यांमध्ये संसर्ग होण्याची शक्यता वाढते. परिणामी तोंडातून वास येऊ शकतो.

व्हिटामिन B12 ची कमतरता

व्हिटामिन B12 कमी असल्यास तोंडात वारंवार छाले येतात. तसेच पचनक्रियाही बिघडू शकते, ज्याचा परिणाम तोंडाच्या दुर्गंधीवर होतो.

व्हिटामिन A ची कमतरता

व्हिटामिन A च्या कमतरतेमुळे तोंड आणि घशातील ओलावा कमी होतो. त्यामुळे तोंड कोरडे पडते आणि दुर्गंधी वाढू शकते.

फॉलिक अ‍ॅसिड (व्हिटामिन B9) ची कमतरता

फॉलिक अ‍ॅसिड कमी असल्यास हिरड्या कमकुवत होतात आणि त्यामध्ये वारंवार संसर्ग होऊ शकतो. हे देखील तोंडाच्या दुर्गंधीचे एक महत्त्वाचे कारण ठरू शकते. त्यामुळे हे व्हिटामिन्स मिळणाऱ्या गोष्टींचा आहारात समावेश करा. सोबतच खालील काही सोपे उपाय करूनही आपण तोंडाची दुर्गंधी घालवू शकता.

तोंडाची दुर्गंधी दूर करण्याचे उपाय

- जेवणानंतर बडीशेप चावून खा यामुळे तोंड ताजेतवाने राहते.

- रोज सकाळी उपाशीपोटी तुळशीची पानं चावा. यानी नैसर्गिकरीत्या दुर्गंधी कमी होते.

- लवंगमुळे तोंडाचा दुर्गंध कमी होतो कारण तिच्यामध्ये अॅंटी-बॅक्टेरीयल घटक असतात. तुम्ही कधीतरी एखादी लवंग नक्कीच चघळू शकता.

- तुम्ही एखादा दालचिनीचा तुकडा चघळू शकता किंवा दालचिनीचा एक कप चहा घेऊ शकता. त्याचप्रमाणे दालचिनीचे तुकडे पाण्यात उकळून ते तुम्ही माऊथवॉश करण्यासाठी देखील वापरु शकता.

- तुमच्या तोंडाला दुर्गंध येत असल्यास तोंडात वेलची ठेवा. किंवा जेवल्यानंतर वेलची टाकलेला चहा घेण्यास हरकत नाही.

Web Title : ब्रश करने पर भी दुर्गंध? विटामिन की कमी हो सकती है कारण।

Web Summary : विटामिन (सी, डी, बी12, ए, बी9) की कमी से सांसों में दुर्गंध आ सकती है। कमियों को दूर करें, सौंफ/तुलसी, लौंग/दालचीनी, इलायची चबाएं।

Web Title : Bad breath despite brushing? Vitamin deficiencies could be the cause.

Web Summary : Bad breath can stem from vitamin deficiencies (C, D, B12, A, B9). Address deficiencies, chew fennel/tulsi, clove/cinnamon, cardamom for fresher breath.