Join us

किचनमधील 'या' ५ वस्तूंमुळेही तुम्ही पडू शकता गंभीर आजारी, जाणून घ्या कारणं आणि पर्याय!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2025 14:15 IST

Kitchen Hacks : किचनमधील भांडी किंवा पॅकिंगच्या साहित्यामुळे आरोग्य बिघडू शकतं. अशात हे जाणून घेऊ अशा काही गोष्टींबाबत ज्या टाळल्या पाहिजे.

Kitchen Hacks : आजकाल लोक आरोग्याची काळजी घेण्यासाठी वेगवेगळे उपाय करतात. जसे की, हेल्दी आहार, एक्सरसाईज, हेल्दी लाइफस्टाईलल फॉलो करणं. पण अनेक अशा छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतात, त्यामुळे त्यांचं आरोग्य धोक्यात येऊ शकतं. सामान्यपणे महिला घराची आणि घरातील सर्व सदस्यांची काळजी घेत असतात. पण किचनमधील एका चुकीमुळे सगळ्यांचं आरोग्य बिघडू शकतं. किचनमधील भांडी किंवा पॅकिंगच्या साहित्यामुळे आरोग्य बिघडू शकतं. अशात हे जाणून घेऊ अशा काही गोष्टींबाबत ज्या टाळल्या पाहिजे.

नॉन-स्टिक कुकवेअर

नॉन-स्टिक भांड्यांचा वापर आजकाल कॉमन बाब झाली आहे. पण यांचा वापर हाय टेम्प्रेचरवर करणं तुमच्या आरोग्यासाठी नुकसानकारक ठरतं. जेव्हा नॉन-स्टिक भांडी जास्त तापमानावर गरम होतात, तेव्हा त्यातून पीएफसी कोटिंग निघू लागतं. ज्यामुळे लिव्हरचं नुकसान होऊ शकतं आणि पचनासंबंधी समस्याही होऊ शकतात.

पर्याय - नॉन-स्टिक भांड्यांऐवजी कास्ट आयरन किंवा स्टेनलेस स्टीलच्या भांड्यांचा वापर करावा. ही भांडी आरोग्यासाठी अधिक सुरक्षित असतात आणि जेवण बनवतात कोणतेही टॉक्सिन सोडत नाहीत.

अ‍ॅल्युमीनियम फॉयल

WHO नुसार, अ‍ॅल्युमीनियम शरीरासाठी गरजेचं असतं. पण त्याचं त्याचं अधिक प्रमाण नुकसानकारक ठरतं. एका रिसर्चनुसार, अ‍ॅल्युमिनियम फॉयलमध्ये पॅक करण्यात आलेलं जेवणामुळे शरीरात अ‍ॅल्युमिनियमचं अवशोषण करतं. ज्यामुळे झिंकची कमतरता होते आणि मेंदू व हाडांच्या आरोग्यावर नकारात्मक प्रभाव टाकतं.

पर्याय - याऐवजी बटर पेपर किंवा सूती कापडांचा वापर करावा. हे अधिक सुरक्षित आणि नॅचरल असतात.

अ‍ॅल्युमीनियमची भांडी

अ‍ॅल्युमिनियमची भांडी स्लो पॉयझनसारखी काम करतात. यांच्या वापरानं जेवणात अ‍ॅल्युमिनियमचे कण मिक्स होतात. जे शरीरात जमा होऊन किडनी आणि फुप्फुसांमध्ये समस्या निर्माण करतात.

पर्याय - अ‍ॅल्युमिनियम भांड्यांऐवजी स्टेनलेस स्टीलच्या भांड्यांचा वापर करावा. जे सुरक्षित आणि टिकाऊ असतात.

प्लास्टिक चॉपिंग बोर्ड

प्लास्टिक चॉपिंग बोर्डवर फळं-भाज्या कापणं घातक ठरू शकतं. कारण या बोर्डमध्ये अनेक बॅक्टेरिया चिकटून असतात, जे पोटात इन्फेक्शनचं कारण ठरतात. त्याशिवाय प्लास्टिकचे कणही आपल्या खाण्यात जातात. ज्यामुळे आरोग्याचं नुकसान होऊ शकतं.

पर्याय - प्लास्टिकच्या चॉपिंग बोर्डऐवजी लाकडाच्या चॉपिंग बोर्डचा वापर करा. हे सुरक्षित आणि नॅचरल असतं.

प्लास्टिकच्या बॉटल्स

प्लास्टिकच्या बॉटल्स आणि कंटेनरमध्ये बिस्फेनॉल ए नावाचा रासायनिक पदार्थ असतो, जो मानवी शरीरासाठी घातक आहे. प्लास्टिकच्या बॉटलच्या नियमित वापरानं रोगप्रतिकारक शक्ती आणि हार्मोनल आरोग्य प्रभावित होऊ शकतं. तसेच लठ्ठपणाही वाढू शकतो.

पर्याय - याऐवजी काचेच्या, तांब्याच्या किंवा स्टीलच्या बॉटल्सचा वापर करा. या टॉक्सिन मुक्त आणि सुरक्षित असतात.

टॅग्स : हेल्थ टिप्सकिचन टिप्स