Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > किडनीला आतून स्वच्छ ठेवतात 'हे' ४ अन्नपदार्थ, पाहा कसा कराल आहारात समावेश

किडनीला आतून स्वच्छ ठेवतात 'हे' ४ अन्नपदार्थ, पाहा कसा कराल आहारात समावेश

चुकीच्या लाइफस्टाईलमुळे आणि चुकीच्या आहारामुळे अनेकांना किडनीसंबंधी समस्या होतात. म्हणूनच आज आपण काही अशा पदार्थांबद्दल जाणून घेऊ, जे किडनीला स्वच्छ आणि निरोगी ठेवण्यात मदत करतात.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2025 10:36 IST2025-10-18T10:35:19+5:302025-10-18T10:36:28+5:30

चुकीच्या लाइफस्टाईलमुळे आणि चुकीच्या आहारामुळे अनेकांना किडनीसंबंधी समस्या होतात. म्हणूनच आज आपण काही अशा पदार्थांबद्दल जाणून घेऊ, जे किडनीला स्वच्छ आणि निरोगी ठेवण्यात मदत करतात.

These 4 foods keep the kidneys clean from inside | किडनीला आतून स्वच्छ ठेवतात 'हे' ४ अन्नपदार्थ, पाहा कसा कराल आहारात समावेश

किडनीला आतून स्वच्छ ठेवतात 'हे' ४ अन्नपदार्थ, पाहा कसा कराल आहारात समावेश

How To Cleansing Natural Kidney: किडनी आपल्या शरीरातील सगळ्यात महत्त्वाच्या अवयवांपैकी एक आहे. किडनीचं मुख्य काम म्हणजे शरीरातील विषारी पदार्थ आणि टॉक्सिन्स बाहेर काढणं तसेच रक्त शुद्ध करणं. त्यामुळे शरीर निरोगी ठेवण्यासाठी किडनीचं हेल्दी असणं अत्यावश्यक आहे. आजच्या काळात चुकीच्या लाइफस्टाईलमुळे आणि चुकीच्या आहारामुळे अनेकांना किडनीसंबंधी समस्या होतात. म्हणूनच आज आपण काही अशा पदार्थांबद्दल जाणून घेऊ, जे किडनीला स्वच्छ आणि निरोगी ठेवण्यात मदत करतात.

किडनी स्वच्छ ठेवण्यासाठी काय खावं?

लसूण

किचनमध्ये सहज मिळणारा लसूण किडनीसाठी फारच फायदेशीर असतो. लसणामध्ये अँटी-ऑक्सिडंट आणि अँटी-इन्फ्लेमेटरी तत्व असतात, जे किडनीच्या पेशींना सूज आणि ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसपासून संरक्षण देतात. हिवाळ्यात लसूण खाल्ल्यानं रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठीही फायदेशीर असतं. अशात आपण लसणाची चटणी करून खाऊ शकता किंवा भाजी-दाळीत फोडणीसाठी वापरू शकता. इतकंच नाही तर रोज सकाळी उपाशीपोटी कच्चा लसूण देखील खाऊ शकता.

हळद

हळदीमध्ये ‘कर्क्युमिन’ नावाचं तत्व असतं, जे एक प्रभावी अँटी-ऑक्सिडंट आणि अँटी-इन्फ्लेमेटरी तत्व आहे. हे किडनीचा टॉक्सिन्स आणि इन्फेक्शनपासून बचाव करतात. इतकंच नाही तर हळद त्वचेसाठी सुद्धा फायदेशीर आहे. रोज सकाळी कोमट पाण्यात थोडी हळद घालून प्या किंवा भाजी, दाळीत वापरा.

काकडी

काकडी शरीरातील टॉक्सिन्स बाहेर काढण्यास मदत करते. यात पाणी भरपूर असल्यानं शरीराला हायड्रेट ठेवते आणि वजन कमी करण्यातही उपयोगी ठरते. अशात काकडी रोज सलाड म्हणून खा. 

लिंबू

लिंबामध्ये असलेलं सिट्रिक अ‍ॅसिड शरीरात स्टोन तयार होण्यापासून संरक्षण करतं. त्याचं अ‍ॅसिडिक रूप शरीरातील अतिरिक्त अ‍ॅसिड कमी करतं आणि वजन कमी करण्यास तसेच त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करतं. त्यामुळे सकाळी उपाशीपोटी कोमट लिंबूपाणी प्या किंवा दाळ-भाजीमध्ये थोडं लिंबू पिळून खा.

Web Title : किडनी को प्राकृतिक रूप से साफ करें: शामिल करने के लिए 4 बेहतरीन खाद्य पदार्थ

Web Summary : किडनी विषहरण के लिए महत्वपूर्ण हैं। लहसुन, हल्दी, खीरा और नींबू एंटीऑक्सीडेंट और एंटी-इंफ्लेमेटरी गुणों से किडनी के स्वास्थ्य में मदद करते हैं। स्वस्थ किडनी फंक्शन और समग्र कल्याण के लिए इन खाद्य पदार्थों को अपने आहार में शामिल करें।

Web Title : Cleanse Your Kidneys Naturally: Top 4 Foods to Include

Web Summary : Kidneys are vital for detoxification. Garlic, turmeric, cucumber, and lemon aid kidney health with antioxidant and anti-inflammatory properties. Incorporate these foods into your diet for a healthier kidney function and overall well-being.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.