Uric Acid : थंडीला सुरूवात होताच अनेक लोकांना सांध्यांच्या दुखण्याची समस्या त्रास देऊ लागते. या वेदनेपासून आराम मिळवण्यासाठी अनेक उपाय केले जातात, पण काही वेळा चुकीच्या सवयींमुळे ही समस्या अधिक वाढते. खासकरून युरिक अॅसिड वाढलं असलेल्या रुग्णांनी थंडीच्या दिवसांत आहाराकडे विशेष लक्ष द्यायला हवं.
जेव्हा शरीरात युरिक अॅसिडची लेव्हल वाढते, तेव्हा ते मूत्राद्वारे बाहेर निघत नाही आणि सांध्यांमध्ये साचू लागतं. यामुळे सुज, वेदना आणि कडकपणा वाढतो. चला जाणून घेऊया की युरिक अॅसिडच्या रुग्णांनी थंडीच्या हंगामात कोणत्या गोष्टी टाळाव्यात.
पालक
युरिक अॅसिडच्या रुग्णांनी आपल्या आहारात पालकाचं जास्त प्रमाण टाळावं. पालकात प्युरिन मोठ्या प्रमाणात असतं, जे शरीरात युरिक अॅसिड वाढवतं. त्यामुळे सांध्यातील वेदना आणि सूज वाढू शकते.
मटार आणि बीन्स
थंडीच्या दिवसात घराघरात मटार आणि बीन्सच्या भाज्या बनतात, पण युरिक अॅसिडच्या रुग्णांसाठी या भाज्या टाळणं चांगलं. या भाज्यांमध्येही प्युरिनचं प्रमाण जास्त असल्याने त्यांचं सेवन केल्याने सांधेदुखी वाढू शकते.
वांगी
थंडीत वांग्याचं भरतं सगळ्यांनाच आवडतं, पण युरिक अॅसिड असणाऱ्यांनी वांग्याचं सेवन टाळावं. वांग्यातही प्युरिन असतं, ज्यामुळे शरीरात दुखणे, सूज आणि कडकपणा वाढण्याची शक्यता असते.
युरिक अॅसिडच्या रुग्णांनी पाणी पुरेसं प्यावं, जेणेकरून अॅसिड शरीरातून बाहेर निघेल. तेलकट, मसालेदार आणि रेड मीटसारख्या पदार्थांचं सेवन टाळा. नियमित हलका व्यायाम आणि चालणे सांध्यांसाठी फायदेशीर ठरतं.
