Join us

सावधान! माउथवॉश वापरणाऱ्यांना कॅन्सरचा मोठा धोका? डॉक्टरांनी दिला गंभीर इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2024 20:21 IST

एका ब्रिटीश सर्जनने आपल्या पॉडकास्टवर काही विशिष्ट प्रकारचे माउथवॉश वापरल्याने कॅन्सरचा धोका वाढतो असं म्हटलं आहे.

एका ब्रिटीश सर्जनने आपल्या पॉडकास्टवर काही विशिष्ट प्रकारचे माउथवॉश वापरल्याने कॅन्सरचा धोका वाढतो असं म्हटलं आहे. करण राजन यांनी माउथवॉशपासून दूर राहा असा सल्ला दिला आहे. याबाबत कोणताही ठोस पुरावा सापडलेला नाही. परंतु काही रिसर्चमधून असं दिसून आलं आहे की यामुळे कॅन्सरचा धोका नक्कीच वाढू शकतो. हे अल्कोहोलपासून बनलेलं असतं, याचा जास्त वेळा वापर केल्यास माउथ कॅन्सरचा धोका वाढतो. 

एका अभ्यासात असं आढळून आलं आहे की, दिवसातून तीन किंवा अधिक वेळा माउथवॉश वापरणं किंवा ४० वर्षांहून अधिक काळ माउथवॉशचा वापर केल्यास कॅन्सरचा धोका असू शकतो. माउथवॉशमुळे तोंडातील बॅक्टेरिया वाढतात, असं रिसर्चमध्ये आढळून आलं आहे. या बॅक्टेरियामुळे हिरड्यांचे आजार, घशाचा कॅन्सर, पोटाचा कॅन्सर तसेच शरीराच्या इतर भागांमध्ये कॅन्सर होऊ शकतो.

तोंडाची नीट स्वच्छता न केल्यामुळे, तोंडात इन्फेक्शन आणि हिरड्यांचे आजार होण्याचा धोका वाढतो. हिरड्या सूजण्याची समस्या निर्माण होते. सुजलेल्या हिरड्या हा कॅन्सरचा एक फॅक्टर असू शकतो. हिरड्यांचा आजार झाल्यास इन्फेक्शन होण्याचा धोका असतो. हिरड्यांच्या आजारासाठी अनेक बॅक्टेरिया जबाबदार असतात. फ्यूसोबॅक्टीरियम न्यूक्लियेटम सारखे बॅक्टेरिया शरीराच्या इतर भागात पसरतो तेव्हा व्यक्ती आजारी पडू लागते.

माउथवॉशमध्ये फुसोबॅक्टेरियम न्यूक्लिएटम आणि स्ट्रेप्टोकोकस अँजिनोससचे प्रमाण जास्त असतं. त्यामुळे तोंडात बॅक्टेरिया मोठ्या प्रमाणात वाढू लागतात. त्यामुळे ट्यूमर वाढण्याचा धोकाही वाढू लागते आणि भविष्यात तो पुढे कॅन्सरच रूप घेतो. त्यामुळे माउथवॉशचा वापर करताना सावध राहा असा सल्ला दिला जात आहे.   

टॅग्स : कर्करोगहेल्थ टिप्सआरोग्य