Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > दिवसातून १५ मिनिटे अनवाणी चालण्याचे आहेत अनेक फायदे, पाहा तज्ज्ञ काय सांगतात

दिवसातून १५ मिनिटे अनवाणी चालण्याचे आहेत अनेक फायदे, पाहा तज्ज्ञ काय सांगतात

There are many benefits of walking barefoot for 15 minutes a day, see what experts say : अनवाणी पायांनी चालल्याने अनेक फायदे मिळतात. तसेच मनालाही समाधान मिळते.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2025 08:20 IST2025-04-05T08:15:58+5:302025-04-05T08:20:01+5:30

There are many benefits of walking barefoot for 15 minutes a day, see what experts say : अनवाणी पायांनी चालल्याने अनेक फायदे मिळतात. तसेच मनालाही समाधान मिळते.

There are many benefits of walking barefoot for 15 minutes a day, see what experts say | दिवसातून १५ मिनिटे अनवाणी चालण्याचे आहेत अनेक फायदे, पाहा तज्ज्ञ काय सांगतात

दिवसातून १५ मिनिटे अनवाणी चालण्याचे आहेत अनेक फायदे, पाहा तज्ज्ञ काय सांगतात

पायाला धूळ लागू नये. माती लागू नये. इतरही घाण लागू नये यासाठी आपण चपल वापरतो. पायाला दगड, खडे रस्त्यावर पडलेल्या इतर वस्तू लागू नयेत यासाठी आपण पायांना संरक्षित करतो. (There are many benefits of walking barefoot for 15 minutes a day, see what experts say)बाहेर जातानाच नाही घरात असतानाही काही जण पायात चपल घालतात. थंडीचा त्रास होऊ नये किंवा पायाला फरशीवरील माती लागू नये इतरही काही कारणे असतात. मात्र डॉक्टर सांगतात. दिवसातून थोडावेळ तरी अनवाणी पायांनी फिरायची सवय असायला हवी. ते शरीरासाठी फायदेशीर ठरते. (There are many benefits of walking barefoot for 15 minutes a day, see what experts say)हेल्थलाईन तसेच व्हेरीवेल हेल्थ सारख्या विविध साईट्सवर अनवाणी पायांनी चालण्याचे फायदे सांगितले आहेत. 

डॉ. हंसाजी योगेंद्र सांगतात, अनवाणी पायांनी दिवसातून पंधरा मिनिटे तरी चालायला हवे. त्यामुळे मानसिक तसेच शारीरिक स्वास्थ्य चांगले राहते.  तसेच पायांची ताकदही वाढते. वैज्ञानिकदृष्या हे सिद्ध झाले आहे की, अनवाणी चांगल्या स्वच्छ जमिनीवर चालण्याने पायांचे आरोग्य चांगले राहते. पायाच्या घोटेची ही ताकद वाढते. काही जणांचा चालताना पाय मुरगळतो. किंवा ट्विस्ट होतो. त्याचे कारण म्हणजे पायाचे संतुलन कमी असते. त्यामुळे असा त्रास होतो. अनवाणी चालल्याने पायांचा बॅलेंन्सही चांगला राहतो. 

पायांचे स्नायू तसेच शीरा मोकळ्या होतात. पाय चपलेमध्ये राहून आखडतात. त्यामुळे दिवसभर पाय चपलेत ठेवणे चांगले नाही. पायावर चपलेचे रॅशही उठतात. लहान मुलांना घरात म्हणूनच अनवाणी चालवले जाते. पायातील ताकद वाढते. पायाला अँक्यूप्रेशर मिळाले तर त्याचा फायदा संपूर्ण शरीराला होतो. अनेक त्रास अँक्यूप्रेशरमुळे बंद होतात. अनवाणी गवतामध्ये चालल्याने पायांना आरामही मिळतो. लॉनमध्ये पायाला टोचणारे गवत किंवा टोक असलेला मॅट आजकाल जीममध्येही ठेवलेला असतो. त्या मॅटवर चालल्याने पायाला आराम मिळतो. नसा मोकळ्या होतात. काही दुखणी असतील तर ती कमी होतात. 

डॉ. हंसाजी योगेंद्र सांगातत, सतत अति विचार करणाऱ्या लोकांनी अनवाणी चालायला हवे. त्याचा फायदा डोकं शांत ठेवण्यासाठीही होतो. वाळूमध्ये अनवाणी चालल्यावर मनाला शांत वाटते. तसेच पाणवठ्याच्या ठिकाणी पाय पाण्यात ठेऊन चालल्यावर आपल्याला समाधान जाणवते. याचाच अर्थ हे सारे मानसिकतेशी आणि मेंदूशीहा जोडलेले असते. त्यामुळे मानसिक त्रास असतील तर अनवाणी चालण्याचे फायदे नक्कीच मिळतील.  
 

Web Title: There are many benefits of walking barefoot for 15 minutes a day, see what experts say

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.