lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > स्वयंपाकासाठी सूर्यफुलाचे तेल वापरणे आरोग्यासाठी चांगले की वाईट? तज्ज्ञ सांगतात सनफ्लॉवर ऑईल वापरत असाल तर..

स्वयंपाकासाठी सूर्यफुलाचे तेल वापरणे आरोग्यासाठी चांगले की वाईट? तज्ज्ञ सांगतात सनफ्लॉवर ऑईल वापरत असाल तर..

The Truth about Sunflower Oil: Is it Really Bad for You : सूर्यफूल नाही मग जेवणासाठी कोणतं खाद्यतेल सुरक्षित, आरोग्यासाठी काय योग्य?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2023 05:35 PM2023-12-10T17:35:31+5:302023-12-10T17:36:22+5:30

The Truth about Sunflower Oil: Is it Really Bad for You : सूर्यफूल नाही मग जेवणासाठी कोणतं खाद्यतेल सुरक्षित, आरोग्यासाठी काय योग्य?

The Truth about Sunflower Oil: Is it Really Bad for You? | स्वयंपाकासाठी सूर्यफुलाचे तेल वापरणे आरोग्यासाठी चांगले की वाईट? तज्ज्ञ सांगतात सनफ्लॉवर ऑईल वापरत असाल तर..

स्वयंपाकासाठी सूर्यफुलाचे तेल वापरणे आरोग्यासाठी चांगले की वाईट? तज्ज्ञ सांगतात सनफ्लॉवर ऑईल वापरत असाल तर..

दैनंदिन आयुष्यात खाद्यपदार्थांमध्ये तेलाचा (Cooking Oil) वापर होतोच. बाजारात विविध प्रकारचे खाद्यतेल मिळतात. प्रत्येक जण आपल्या आरोग्याच्या दृष्टीने कोणतं तेल योग्य राहिल, याची खरेदी करतात. उत्तम आरोग्यासाठी आहारात तेलाचा समावेश करायला हवाच. पण अतिप्रमाणात तेलाचे सेवन करू नये. शिवाय बरेच जण डीप फ्राईड पदार्थ आवडीने खातात. पण नियमित डीप फ्राईड पदार्थ आरोग्यासाठी हानिकारक मानले जाते. जर आपण तळणीसाठी सनफ्लॉवर ऑइलचा (SunFlower Oil) वापर करत असाल तर, आताच थांबा, कारण डिप फ्रायिंगसाठी (Deep fry) याचा वापर न करण्याचा सल्ला आयुर्वेदिक डॉक्टर वकलक्ष्मी यनमन्द्रा यांनी दिला आहे.

यांसदर्भात डॉक्टर सांगतात, 'सूर्यफूल तेलामध्ये ओलिक अॅसिड जास्त प्रमाणात असते. जे हृदय निरोगी ठेवण्यासाठी उपयुक्त ठरते. परंतु, याचा वापर तळणीसाठी करू नये. उच्च तापमानात हे तेल स्थिर राहत नाही. हे तेल हानिकारक रसायने ऑक्सिडाइझ करते आणि रिलीज करते. ज्यामुळे आरोग्यावर दुष्परिणाम घडू शकते'(The Truth about Sunflower Oil: Is it Really Bad for You).

ते पुढे म्हणतात, 'एका स्टडीनुसार, सूर्यफूल तेल, पाम तेल, रेपसीड तेल आणि सोयाबीन तेल तळणीसाठी योग्य नाही. स्टडी करताना या तेलात किचन टेंपरेचरवर बटाट्याचे चिप्स तळण्यात आले. या प्रयोगातून असे दिसून आले की, सूर्यफूल तेल इतर तेलांपेक्षा जास्त प्रमाणात अल्डीहाइड सोडते. जे कर्करोग, हृदयविकार, लठ्ठपणा आणि अल्झायमर यासह अनेक रोगांशी अल्डीहाइड्सचा संबंध आहे.'

मुठभर मुरमुरे खाण्याचे ५ जबरदस्त फायदे, पचन सुधारेल-वजनही होईल कमी, हाडांना मिळेल बळकटी

तळणीसाठी कोणते तेल वापरावे?

ज्या तेलाचा स्मोकिंग पॉईंट १७७ अंश सेल्सिअस पर्यंत आहे, त्या तेलाचा आपण वापर डीप फ्रायिंगसाठी करू शकता. परंतु, सतत वापरलेल्या तेलाचा पुन्हा वापर तळणीसाठी करू नये.

हाडांना मिळणार बळकटी-दातही राहतील मजबूत, फक्त न चुकता खा कॅल्शियमयुक्त ५ पदार्थ, आरोग्यासाठी उत्तम

- तूप : तुपाचा वापर आपण तळणीसाठी करू शकता.  कारण ते उच्च तापमानातही स्थिर राहते. शिवाय तूप आरोग्यासाठीही उत्तम मानले जाते.

- खोबरेल तेल : खोबरेल तेल उच्च तापमानातही स्थिर राहते, शिवाय त्याचे दाहक-विरोधी गुणधर्म अन्न निरोगी ठेवण्यास मदत करतात. जे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

Web Title: The Truth about Sunflower Oil: Is it Really Bad for You?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.