Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > जिभेचा रंग सांगतो तब्येत बरी आहे की बिघडली? जिभेचा नैसर्गिक गुलाबी रंग बदलला तर....

जिभेचा रंग सांगतो तब्येत बरी आहे की बिघडली? जिभेचा नैसर्गिक गुलाबी रंग बदलला तर....

blue tongue colour could be a sign of lack of oxygen know reasons : Tongue color What does it say about health : The surprising fact the colour of your tongue tells about your health : जिभेचा रंग बदलला तर...ऑक्सिजनच्या कमतरतेपासून किडनी विकारांपर्यंत होऊ शकतात गंभीर आजार...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2025 13:53 IST2025-05-26T13:39:29+5:302025-05-26T13:53:17+5:30

blue tongue colour could be a sign of lack of oxygen know reasons : Tongue color What does it say about health : The surprising fact the colour of your tongue tells about your health : जिभेचा रंग बदलला तर...ऑक्सिजनच्या कमतरतेपासून किडनी विकारांपर्यंत होऊ शकतात गंभीर आजार...

The surprising fact the colour of your tongue tells about your health blue tongue colour could be a sign of lack of oxygen know reasons Tongue color What does it say about health | जिभेचा रंग सांगतो तब्येत बरी आहे की बिघडली? जिभेचा नैसर्गिक गुलाबी रंग बदलला तर....

जिभेचा रंग सांगतो तब्येत बरी आहे की बिघडली? जिभेचा नैसर्गिक गुलाबी रंग बदलला तर....

'जीभ' हा आपल्या सर्वात महत्वाच्या अवयवांपैकी एक आहे. आरोग्याची काळजी घेताना काहीवेळा शरीरात दिसणाऱ्या वेगवेगळ्या लक्षणांकडे आपण दुर्लक्ष करतो. अशा परिस्थितीत, शरीरात काही बिघाड झाल्यास आपले अवयव आपल्याला विविध प्रकारचे संकेत देखील देतात. जीभ देखील असाच एक (blue tongue colour could be a sign of lack of oxygen know reasons) अवयव आहे, जो केवळ चवच नाही तर शरीरातील समस्यांबद्दल देखील सांगतो. सर्वसाधारणपणे, आपली जीभ रंग बदलून विविध आजारांचे संकेत देते(Tongue color What does it say about health).

जिभेचा रंग सामान्यपेक्षा बदलणे हे काही अंतर्गत समस्येमुळे असू शकते. याद्वारे तुम्हाला व्हिटॅमिनची कमतरता, ऍलर्जी आणि कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती यासारख्या समस्यांबद्दल माहिती मिळू शकते. तसेच, जिभेद्वारे हृदय आणि मूत्रपिंडाचे आजार लवकर ओळखता येतात. सध्या बदलत्या लाईफस्टाईलनुसार, विविध आजारांचा धोका झपाट्याने वाढत आहे, अशा परिस्थितीत, जर आपण आपल्या स्वतःच्या अवयवांमधून होणारे बदल ओळखू शकलो आणि डॉक्टरांकडून (The surprising fact the colour of your tongue tells about your health) वेळेवर योग्य उपचार घेऊ शकतो, यामुळे गंभीर आजार टाळता येणे सहज शक्य होते. आयुर्वेद व आधुनिक वैद्यकशास्त्र या दोहोंमध्ये जिभेच्या निरीक्षणाला एक निदानात्मक साधन मानतात. किडनीच्या कार्यावर परिणाम झाल्यास त्याचे काही संकेत जिभेवर दिसू लागतात, असे बदल कोणते आहेत ते पाहूयात... 

निरोगी जिभेचा रंग कसा असतो ?

खरंतर, निरोगी जिभेचा रंग हा गुलाबी असतो. जिभेचा रंग गुलाबी रंगाच्या हलक्या ते गडद छटांपर्यंत वेगवेगळ्या रंगाचा असू शकतो. जीभेच्या पृष्ठभागावर लहान - लहान छोटे दाणे असतात, जायला पॅपिल (Papillae) असे म्हटले जाते. हे पॅपिले अत्यंत महत्त्वाचे कार्य करतात, ते आपल्याला चव ओळखायला, बोलायला, अन्न चघळायला आणि गिळायला मदत करतात.

पोषणतज्ज्ञ सांगतात, कायम लक्षात ठेवा ३ नियम, बद्धकोष्ठतेच्या समस्येतून होईल सुटका - सकाळी वाटेल फ्रेश!

क्लीव्हलँडक्लिनिक रिपोर्टनुसार, जर तुमच्या जिभेचा रंग गुलाबी रंगाव्यतिरिक्त इतर कोणत्याही रंगात बदलला तर ते कोणत्याही आजाराच्या स्थितीचे लक्षण असू शकते. अशा परिस्थितीत, तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधला पाहिजे. 

जिभेचा गुलाबी रंग बदलून निळा झाला तर... 

जिभेचा नैसर्गिक गुलाबी रंग बदलून जर निळा झाला तर, वेळीच आपल्या आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे. कारण जिभेची ही स्थिती गंभीर आजाराचे लक्षण असू शकते. जिभेचा रंग बदलून निळा झाल्यास सायनोसिस किंवा तुमच्या रक्तात ऑक्सिजनची कमतरता दर्शवू शकते.

ही कमतरता विविध कारणांमुळे निर्माण होऊ शकते, जसे की रक्तासंबंधित विकार, रक्तवाहिन्यांचे आजार , फुफ्फुसातून ऑक्सिजनची कमतरता किंवा मूत्रपिंडाचे आजार यांचा समावेश असू शकतो. रक्तातील ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे किडनीचे देखील अनेक आजार सतावू शकतात. रक्तातील ऑक्सिजनची पातळी कमी असणे हे गंभीर आहे आणि अशा परिस्थितीत, वेळीच डॉक्टरांकडे जाऊन उपचार घेणे गरजेचे आहे. 

रात्री वारंवार लघवीला उठावे लागते, झोपमोड होते ? डॉक्टर सांगतात ४ उपाय, झोप लागेल शांत...

एक्झिमा हा एक सामान्य त्वचारोग आहे, जो त्वचेवर चट्टे, कोरडी त्वचा आणि तीव्र खाज येण्यास कारणीभूत ठरु शकतो. काही प्रकरणांमध्ये, या स्थितीचा परिणाम जीभेवरही होऊ शकतो आणि त्यामुळे जीभेचा रंग नीळसर होऊ शकतो. जर तुमच्या जिभेचा रंग नीळा होत असेल, तर दुर्लक्ष करून चालणार नाही.  अशा परिस्थितीत, तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या, जेणेकरून वेळेत योग्य निदान आणि उपचार मिळू शकतील.

Web Title: The surprising fact the colour of your tongue tells about your health blue tongue colour could be a sign of lack of oxygen know reasons Tongue color What does it say about health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.