Join us

जमिनीवर मांडी घालून बसण्याचे ५ फायदे, खाली बसताच येत नाही असं होण्यापूर्वी बदला सवयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2023 15:16 IST

The Surprising Benefits of Sitting on the Floor Every Day मांडी घालून जेवायला बसणे ही एक सवय, पण आपण एरव्हीही खूर्ची सोडून खाली बसतो का?

भारतीय संस्कृतीनुसार खाली बसून जेवणाची प्रथा आहे. त्यामागे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. सध्या डायनिंग टेबल, सोफा, खुर्ची यावर बसून जेवण केले जाते. या आरामदायी जीवनशैलीमुळे अनेकांची खाली बसून जेवणाची सवय मोडली आहे. दररोज १५ ते ३० मिनिटे खाली बसून जेवल्याने आरोग्याला अनेक फायदे मिळतात.

'बिल्ट टू मूव्ह' या पुस्तकानुसार, ''दहा निरोगी सवयींपैकी एक म्हणजे मांडी घालून जमिनीवर बसणे. या एक्टिव्हीटीमुळे शरीरातील सर्व घटक मुक्तपणे आणि सहजतेने कार्य करतात. नियमित १५ ते २० मिनिटे जमिनीवर बसल्याने आरोग्यात कोणते बदल घडतात ते पाहूयात.

पचनक्रिया सुधारते

जमिनीवर बसून अन्नाचे सेवन केल्याने आरोग्याला अनेक फायदे मिळतात. यात आपण सेवन करत असलेले अन्न योग्यरित्या पचते, यासह पचनक्रिया सुरळीत कार्य करते. यासह पदार्थातील पौष्टीक घटक आरोग्याला मिळतात.

मुळव्याधाचा असह्य त्रास होतो? ५ पदार्थ नियमित खा, पाइल्सचा त्रास होईल कमी

शरीराचा फिटनेस वाढतो

जमिनीवर बसणे शरीरासाठी खूप फायदेशीर आहे, कारण यामुळे शरीरातील वेदना आणि तणाव कमी होण्यास मदत होते. यासह शरीराचा फिटनेस वाढतो आणि आपण इतर कामात सक्रिय राहतो.

सायटिका वेदनेपासून आराम

सायटिका वेदनेपासून आराम हवं असल्यास, जमिनीवर बसून अन्नाचे सेवन करा. यामुळे शरीरातील नसांना आराम मिळतो आणि वेदना कमी होतात. सायटिकाची तीव्र कळ आल्यास जमिनीवर काहीवेळ बसा.

कंबर - नितंबावरील चरबी वाढली? ३ सोपी योगासने नियमित, बेढब शरीर होईल सुडौल

अधिक ऊर्जा

जेव्हा आपण जमिनीवर बसतो, तेव्हा जमिनीतून शरीराच्या संपर्कात येणारी उर्जा आपल्यासाठी लाभदायक ठरते. जे शरीराच्या कार्यांना गती देते, यामुळे तुम्हाला अधिक उत्साही वाटते.

मणक्याचे स्थिरता

जमिनीवर बसल्याने मणक्याची स्थिरता वाढते आणि पाठदुखीसारख्या समस्यांपासून आराम मिळतो.

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्य