lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > मूळव्याधाचा असह्य त्रास होतो? ५ पदार्थ नियमित खा, पाइल्सचा त्रास होईल कमी

मूळव्याधाचा असह्य त्रास होतो? ५ पदार्थ नियमित खा, पाइल्सचा त्रास होईल कमी

Food for Piles: 5 Foods to Fight Hemorrhoids मूळव्याध हा आजार त्रासदायक आहेच मात्र आहार बदल केला तर त्रास कमी होऊ शकतो.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2023 02:57 PM2023-04-04T14:57:36+5:302023-04-05T13:09:08+5:30

Food for Piles: 5 Foods to Fight Hemorrhoids मूळव्याध हा आजार त्रासदायक आहेच मात्र आहार बदल केला तर त्रास कमी होऊ शकतो.

Food for Piles: 5 Foods to Fight Hemorrhoids | मूळव्याधाचा असह्य त्रास होतो? ५ पदार्थ नियमित खा, पाइल्सचा त्रास होईल कमी

मूळव्याधाचा असह्य त्रास होतो? ५ पदार्थ नियमित खा, पाइल्सचा त्रास होईल कमी

मूळव्याध हा एक वेदनादायक आजार आहे. ज्यामुळे गुदाशयात गाठी येतात किंवा रक्तस्त्राव होतो. मुळव्याध झाल्यानंतर जळजळ, रक्तस्त्राव आणि गुदद्वाराच्या भागात खाज सुटणे यासारखी लक्षणे दिसतात. रक्तस्त्राव जर अतिप्रमाणावर होत असेल तर, शरीरात देखील रक्ताचा तुटवडा जाणवतो. ज्यामुळे शरीरात विविध आजार उद्भवण्याची शक्यता निर्माण होते. वयानुसार मूळव्याध होण्याचा धोका वाढतो, कारण गुदाशय आणि गुदद्वाराला आधार देणारे ऊतक कमकुवत होतात(Food for Piles: 5 Foods to Fight Hemorrhoids ).

मूळव्याध हे दोन प्रकारचे असतात. पहिला अंतर्गत मूळव्याध जो गुदाशयाच्या आतमध्ये विकसित होतो, आणि दुसरा बाह्य मूळव्याध, जो बाहेर म्हणजे गुदाशयाच्या भोवतीच्या त्वचेखाली विकसित होतो. या दोन्ही प्रकरणात रक्तस्त्राव होतो. त्यामुळे मूळव्याध या आजारावर त्वरित उपचार करणे गरजेचं. यासंदर्भात, आयुर्वेदिक डॉक्टर मिहीर खत्री पाच पदार्थ सांगितल्या आहेत, ज्याच्या सेवनामुळे मुळव्याधाच्या आजारापासून आराम मिळू शकतो.

 आयुर्वेदिक उपाय

सुरणाची भाजी

जर आपल्याला मुळव्याधाचा त्रास होत असेल तर, सुरणाची भाजी खा. सुरण अनेक गुणांनी समृद्ध आहे, त्यात जीवनसत्त्व 'ए' बरोबर कॅल्शियम, तांबे, सेलेनियम, फॉस्फरस, पोटॅशियम, जस्त आणि मॅग्नेशियम ही खनिजं आढळतात. ही भाजी बाजारात सहज मिळते. डॉक्टरांच्या मते, ही भाजी तुपात शिजवून खा, तुपात शिजवलेली ही भाजी आठवड्यातून तीन वेळा खाल्ल्यास आराम मिळेल.

कोथिंबिरीचा रस प्याल्याने किडनीचे आजार, युरीन इन्फेक्शन कमी होतात का? तज्ज्ञ सांगतात...

मूळव्याधावर ताक हा उत्तम उपाय

उन्हाळा सुरू झाला आहे, उष्णतेपासून आराम मिळवण्यासाठी अनेक जण ताकाचे सेवन करतात. ताक नियमित प्यायल्याने पचनक्रिया सुधारते. व शरीरातील पाण्याची कमतरताही पूर्ण होते. यामुळे बद्धकोष्ठता आणि मूळव्याधापासून आराम मिळू शकतो.

दुधात तूप मिसळून प्या

मूळव्याधाच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी, रात्री झोपण्यापूर्वी एक कप कोमट दुधात एक चमचा देशी तूप मिसळून प्या. हा उपाय आतड्याच्या हालचालींना चालना देण्यासाठी मदत करू शकते.

दह्यात मीठ घालून खावे की साखर? तज्ज्ञ सांगतात काय फायद्याचं - कशाने बिघडते तब्येत

भरपूर पाणी प्या

पाणी न पिणे हे बद्धकोष्ठतेचे सर्वात मोठे कारण आहे. पाणी प्यायल्याने अन्न पचन होण्यास मदत होते. दिवसभर भरपूर पाणी प्या. शरीराला हायड्रेटेड ठेवण्यासाठी पाणी आवश्यक आहे, तहान लागली नसली तरी पाणी पीत राहा.

Web Title: Food for Piles: 5 Foods to Fight Hemorrhoids

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.