Join us   

व्हिटामीन-D हवं पण उन्हात जायला आवडत नाही? १ उपाय , कमकुवत हाडांना मिळेल ताकद

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2024 11:23 AM

The Right Way To Get Vitamin D From Sun : व्हिटामीन डी शरीराला कॅल्शियम शोषण्यास मदत करते जे हाडांच्या कार्यासाठी महत्वाचे असते.

शरीरात व्हिटामीन डी (Vitamin D) ची कमतरता उद्भवणं खूपच कॉमन झालं आहे. ९० टक्के लोकांना व्हिटामीन डी च्या कमतरतेचा सामना करावा लागतो. (How To Get Vitamin D Without Sun) घरी बसून राहिल्यामुळे पोषक तत्वांची कमतरता जाणवते. ज्यामुळे शारीरिक आणि मानसिक विकासावरही परिणाम होतो. मुलांची हाईट वाढवण्यासाठी व्हिटामीन डी आवश्यक असते. (The Right Way To Get Vitamin D From Sun) व्हिटामीन डी शरीराला कॅल्शियम शोषण्यास मदत करते जे हाडांच्या कार्यासाठी महत्वाचे असते. शरीरातील नसा, स्नायू आणि रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी व्हिटामीन डी आवश्यक असते. (How to Safely Get Vitamin D From Sun)

हेल्थलाईनच्या रिपोर्टनुसार सुर्य हा व्हिटामीन डी चा नैसर्गिक स्त्रोत आहे. व्हिटॅमिन डी शरीराला कॅल्शियम शोषण्यास मदत करते, जे हाडांच्या मुख्य बिल्डिंग ब्लॉक्सपैकी एक आहे. शरीराला नसा, स्नायू आणि रोगप्रतिकारक शक्ती योग्यरित्या कार्यरत ठेवण्यासाठी व्हिटॅमिन डी देखील आवश्यक आहे. काही पदार्थांमध्ये व्हिटामीन डी चे प्रमाण जास्त असते. (East Ways To Get Vitamin D Without Risking Excessive Sun Exposure)

व्हिटामीन डी कसे वाढवावे?

एक्सपर्ट्सच्यामते व्हिटामीन डी घेण्यासाठी सकाळच्या ऊन्हात बसायला हवं पण इतका वेळ ऊन्हात बसणं सर्वांनाच शक्य असते असं नाही. हर्बल डॉक्टर निशांत गुप्ता यांनी व्हिटामीन डी ची कमतरता पूर्ण  करण्यासाठी २ घरगुती उपाय सांगितले आहेत. ज्यामुळे हाडांमध्ये ताकद येईल आणि हाईट देखिल चांगली वाढेल. (६२ व्या वर्षी तरूण-हॉट दिसणारा सुनिल शेट्टी खातो तरी काय? पाहा साधं-सोपं फिटनेस रूटीन)

बांबूचा मुरांबा

डॉक्टर सांगतात की बांबूचा मुरांब्बा खाणं हा उत्तम पर्याय आहे. सकाळी आणि संध्याकाळी ५० ग्राम मुरांबा खा. हे एक देशी फूड असून  व्हिटामीन डी ची कमतरता पूर्ण करण्यासाठी बांबूचा मुरांबा फायदेशीर ठरतो. ज्यामुळे नजर तीक्ष्ण राहते आणि शरीराला एंटी ऑक्सिडेंट्स मिळतात. 

६२ व्या वर्षी तरूण-हॉट दिसणारा सुनिल शेट्टी खातो तरी काय? पाहा साधं-सोपं फिटनेस रूटीन

मशरूमचे सेवन करा

डॉक्टर सांगतात की व्हिटामीन डी ची कमतरता पूर्ण करण्यासाठी मशरूमचे सेवन करा. हे एक लो कॅलरी फूड आहे ज्यातून प्रोटीन्स, फायबर्स आणि एंटी ऑक्सिडेंट्स शरीराला मिळतात. हृदय, मेंदू आणि डोळ्यांच्या आरोग्यासाठी हे एक उत्तम फूड आहे. (९९ टक्के लोकांना माहीत असते पाणी पिण्याची योग्य पद्धत; या पद्धतीने पाणी प्या- मेंटेन राहाल)

मशरूम

मशरूम खाल्ल्याने दैंनदिन व्हिटामीन डी ची कमतरता पूर्ण होण्यास मदत होते. मशरूम अर्धा तास आधी ऊन्हात सुकवायला ठेवा. मशरूम ऊन्हात ठेवल्यामुळे त्यातील इगोस्टेरॉल व्हिटामीन डी मध्ये बदलते. 

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्यलाइफस्टाइल