Old injuries increases in Winter : थंडी वाढायला सुरूवात झाली की, शरीरातील जुनं दुखणं डोकं वर काढू लागतं. म्हणजे एखादी जुनी जखम झाली असेल तर ती पुन्हा दुखायला लागते किंवा हाडांमध्ये किंवा जॉइंट्समध्ये वेदना होऊ लागतात. दिल्लीतील अपोलो स्पेक्ट्रा हॉस्पिटलचे ऑर्थोपेडिक्स आणि स्पाइन तज्ज्ञ डॉ. आशिष धवन यांच्या मते, जेव्हा तापमान कमी होतं, तेव्हा शरीरातील रक्तवाहिन्या आकुंचन पावतात, ज्यामुळे रक्तप्रवाह कमी होतो. अशात जुन्या जखमेच्या भागात ऑक्सिजन आणि पोषक तत्त्वांचा पुरवठा देखील कमी होतो, त्यामुळे त्या भागातील टिश्यू थंड आणि कडक वाटू लागतात. यामुळे त्या जागी पुन्हा दुखणे आणि सूज निर्माण होऊ शकते.
हिवाळ्यात हाडांच्या वेदनेमागील कारणे
संधिवात, ऑस्टिओपोरोसिस किंवा जुने फ्रॅक्चर असलेल्या लोकांना थंडीच्या दिवसात अधिक त्रास होतो, कारण त्यांच्या सांध्यातील नसांवर तापमानातील बदलाचा परिणाम लवकर होतो.
थंडीत शारीरिक हालचाल कमी होणे आणि सूर्यप्रकाशाची कमतरता यामुळे शरीरातील व्हिटामिन D आणि कॅल्शियमचं प्रमाण कमी होतं. त्यामुळे हाडांची ताकद कमी होते आणि जुने जखमी भाग अधिक दुखू लागतात.
शरीराचं तापमान टिकवण्यासाठी थंडीत मांसपेशी आकुंचन पावतात. जुन्या जखमेच्या ठिकाणी असलेल्या मांसपेशी आधीच कमजोर असल्याने, त्या अधिक सख्त होऊन वेदना वाढवतात.
काय कराल उपाय?
आहाराकडे लक्ष द्या
थोडा आहार सुधारल्याने हा त्रास कमी होऊ शकतो. आहारात पुढील गोष्टींचा समावेश करा. कॅल्शियम आणि व्हिटामिन D युक्त पदार्थ जसे की, दूध, दही, पनीर, तीळ, बदाम, ओमेगा-३ फॅटी अॅसिड असलेलं अक्रोड, मासे खा.
सकाळची ऊन्ह घ्या
कोणत्याही प्रकारच्या दुखण्याच्या गोळ्या किंवा ऑइल मसाज डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय करू नका, कारण प्रत्येकाची हाडांची स्थिती आणि जखमेचे स्वरूप वेगळे असते.
काळजी आणि घरगुती उपाय
जुन्या जखमेचा किंवा फ्रॅक्चरचा भाग नेहमी उबदार ठेवा. थंड वाऱ्यापासून बचावासाठी वूलन बँडेज किंवा गरम कपडे वापरा. दररोज हलका व्यायाम आणि स्ट्रेचिंग करा, ज्यामुळे रक्तप्रवाह सुधारतो आणि सांधे लवचिक राहतात. एकाच स्थितीत खूप वेळ बसणे किंवा झोपणे टाळा. जर वेदना वाढत असेल, सूज येत असेल किंवा चालताना त्रास होत असेल, तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.
हिवाळ्यात आपल्या शरीराची योग्य काळजी घेणं म्हणजे गरम राहणे, नियमित हालचाल करणे आणि पोषक आहार घेणे. तर जुन्या हाडांच्या जखमांमुळे होणाऱ्या त्रासावर आपण बर्याच अंशी नियंत्रण ठेवू शकतो.
