ओव्याची पानं (Ajwain Leaves) ज्यांना कर्पूरवल्ली असंही म्हटलं जातं. ही केवळ शोभेची झाडं नसून औषधी गुणांचा खजिना आहे. भारतीय आयुर्वेदानुसार या पानांना अनन्य साधारण महत्व आहे. ही पानं दिसायला जाड, मऊ आणि सुगंधी असतात. ज्यांचा वापर घरगुती उपचारांमध्ये पिढ्यानपिढ्या केला जात आहे. (Benefits Of Ajwain Leaves)
१) रिसर्चनुसार जर तुम्हाला अपचन, गॅस पोट फुगणं किंवा एसिडीटीचा त्रास होत असेल तर ही पानं चावून खाणं किंवा त्यांचा रस पिणं अत्यंत फायदेशीर ठरते. (Ref)
२)ओव्याच्या पानांमुळे पोटातील जळजळ कमी होऊन पचनक्रिया सुरळीत राहते.
३) हिवाळ्यात किंवा पावसाळ्यात होणाऱ्या सर्दी, खोकल्यावर ओव्याची पानं रामबाण उपाय मानली जातात. या पानांमध्ये एंटी बॅक्टेरिअल आणि एंटी व्हायरल गुणधर्म असतात.
४) घसा खवखवणं किंवा छातीत कफ साचल्यास या पानांचा काढा घेतल्यानं त्वरीत आराम मिळतो.
५) लहान मुलांसाठी हा एक सुरक्षित घरगुती उपाय आहे. कारण यामुळे फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढते आणि श्वसनमार्ग मोकळा होतो.
६) ओव्याच्या पानांमध्ये व्हिटामीन ए, सी आणि ओमेगा-६ फॅटी एसिड्स असतात. जे शरीराची रोगप्रतिकारकशक्ती बळकट करतात.
७) तसंच यात सूज कमी करणारे गुणधर्म असल्यामुळे सांधेदुखी किंवा स्नायूंच्या वेदनांवर या पानांचा लेप लावल्यास आराम मिळतो.
८) या पानांचा उपयोग त्वचेच्या समस्यांवरही केला जातो. पानांचा रस त्वचेवर लावल्यानं खाज आणि एलर्जी कमी होते
९) ही पानं शरीरातील विषारी घटक बाहेर काढण्यास मदत करतात ज्यामुळे रक्ताभिसरण सुधारते. खिडकीत किंवा बागेत लावलेलं छोटं रोप आपल्या कुटूंबासाठी फायदेशीर ठरू शकतं.
१०) ओव्याच्या पानांचा सर्वात महत्वाचा फायदा पचनसंस्थेशी संबंधित आहे. या पानांमध्ये थायमॉल नावाचे घटक असतात जे पाचक रस सक्रीय करतात.
ओव्याच्या पानांचा वापर कसा करावा?
ओव्याची पानं कच्ची चावून खाऊ शकता किंवा त्याचा काढा बनवून पिऊ शकता किंवा सुका मेवा आणि ओव्याच्या पानांची चटणी करून आहारात समावेश करू शकता. ही पानं वाळवून त्याची पावडर देखील साठवून ठेवता येते. आरोग्याच्या अनेक समस्यांवर ओव्याची पानं हा एक सुरक्षित, स्वस्त आणि प्रभावी उपाय आहे.
