Skipping Breakfast Side Effects : जास्तीत जास्त महिला दिवसाची सुरूवात घरातील वेगवेगळ्या कामांपासून करतात. जसे की, कुटुंबातील लोकांचा चहा नाश्ता, मुलांची शाळेची तयारी, पतीचा जेवणाचा डबा, घराची सफाई आणि त्यानंतर पाठपूजा. हे सगळं केल्यानंतरच त्या त्यांच्यासाठी वेळ काढू शकतात. हे सगळं करता करता 11 ते 12 वाजतात. पण हे सगळं करताना त्या एक महत्वाची गोष्ट विसरतात. जी त्यांच्या आरोग्यासाठी खूप महागात पडू शकते.
डॉक्टर सांगतात की, सकाळी उशीरा नाश्ता करणं वेगवेगळ्या आजारांचं कारण ठरू शकतं. जेव्हा आपण सकाळी उशारी नाश्ता करतो तेव्हा पोटामध्ये अॅसिड तयार होऊ लागतं. ज्यामुळे पोटाच्या आतील थराचं नुकसान होतं. ज्यामुळे अॅसिडिटी होते आणि याच अॅसिडिटीमुळे पुढे जाऊन अल्सर होतं. जे नुकसानकारक असतं.
डॉक्टर सांगतात की, सगळ्याच महिलांनी सकाळी 8 ते 9 वाजता दरम्यान काहीतरी खायला हवं. फळं, ड्राय फ्रूट्स किंवा मोड आलेले कडधान्य खायला हवेत. तसेच ते म्हणाले की, असं काही गरजचे नाही की, सकाळी पराठे किंवा इतर भाज्या बनवून खाव्यात. रात्री राहिलेलं सुद्धा तुम्ही खाऊ शकता. ज्यूस किंवा कोमट पाणीही पिऊ शकता.
डॉक्टर म्हणाले की, जर सकाळी नाश्ता न करण्याची सवय सुधारली तर येणाऱ्या काळात थायरॉईड, अॅनीमिया, कमजोरी आणि सतत येणारा थकवा या समस्या दूर करण्यास मदत मिळेल.
जर तुम्ही अशा महिलांमध्ये असाल की, ज्या घरातील कामाच्या नादात स्वत:कडे दुर्लक्ष करत असाल तर तुम्ही वेळीच सावध होण्याची गरज आहे. कारण सकाळचा नाश्ता शरीरासाठी खूप महत्वाचा असतो.
नाश्ता न करण्याचं नुकसान
अमेरिकन जर्नल ऑफ क्लीनिकल न्यूट्रिशनमध्ये प्रकाशित एका रिसर्चनुसार, जे लोक रोज सकाळी नाश्ता करत नाहीत, त्यांना शरीरात आयर्न कमी होण्याची समस्या होण्याचा धोका अधिक असतो.