Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > सगळे ग्रीन टी पितात म्हणून तुम्हीही पिता? पाहा ग्रीन टी पिण्याची योग्य वेळ - तरच तब्येतीला बरे...

सगळे ग्रीन टी पितात म्हणून तुम्हीही पिता? पाहा ग्रीन टी पिण्याची योग्य वेळ - तरच तब्येतीला बरे...

Best Time To Drink Green Tea Morning Empty Stomach Or Between Meals Told By Dietitians : The Best Time to Drink Green Tea for Maximum Antioxidant Absorption, According to Dietitians : best time to drink green tea : When is the best time of day to drink green tea : ग्रीन टी पिण्याची योग्य वेळ असते, त्याचवेळी प्यायल्यास पोषणमूल्य शरीराला सर्वाधिक प्रमाणांत मिळतात.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2025 13:40 IST2025-06-14T13:24:53+5:302025-06-14T13:40:18+5:30

Best Time To Drink Green Tea Morning Empty Stomach Or Between Meals Told By Dietitians : The Best Time to Drink Green Tea for Maximum Antioxidant Absorption, According to Dietitians : best time to drink green tea : When is the best time of day to drink green tea : ग्रीन टी पिण्याची योग्य वेळ असते, त्याचवेळी प्यायल्यास पोषणमूल्य शरीराला सर्वाधिक प्रमाणांत मिळतात.

The Best Time to Drink Green Tea for Maximum Antioxidant Absorption, According to Dietitians best time to drink green tea When is the best time of day to drink green tea | सगळे ग्रीन टी पितात म्हणून तुम्हीही पिता? पाहा ग्रीन टी पिण्याची योग्य वेळ - तरच तब्येतीला बरे...

सगळे ग्रीन टी पितात म्हणून तुम्हीही पिता? पाहा ग्रीन टी पिण्याची योग्य वेळ - तरच तब्येतीला बरे...

सध्या आपल्याकडे ग्रीन टी पिण्याचा नवा ट्रेंडच आला आहे. आजकालच्या काळात ग्रीन टी पिणे हे फक्त आरोग्यापुरतेच मर्यादित न राहता ते रिच स्टेट्स म्हणून देखील ओळखले जाते. खरंतर, ग्रीन टी पिण्याचे (The Best Time to Drink Green Tea for Maximum Antioxidant Absorption, According to Dietitians) अनेक फायदे आहेत. ग्रीन टी पिणे आपल्या संपूर्ण आरोग्याच्या दृष्टीने उपयुक्त ठरते. वेटलॉस, त्वचा व केसांसाठी आणि शरीरातील टॉक्सिन्स पदार्थ बाहेर काढण्यासाठी ग्रीन टी (best time to drink green tea) मदत करते. आपल्यापैकी बरेचजण ग्रीन टी अगदी आवडीने पितात. कुणी सकाळी, दुपारी, संध्याकाळी किंवा रात्री आपल्या सोयीनुसार, तर कुणी घरी- ऑफिसमध्ये कंटाळा घालवण्यासाठी अशा वेगवेगळ्या वेळी आणि विविध कारणांसाठी ग्रीन टी पितात. परंतु ग्रीन टी पिण्याची योग्य वेळ नेमकी कोणती हे आपल्यापैकी बऱ्याचजणांना माहीतच नसते(When is the best time of day to drink green tea).

ग्रीन टी पिण्याची योग्य वेळ असते, त्याचवेळी प्यायल्यास ग्रीन टीची पोषणमूल्य शरीराला सर्वाधिक प्रमाणांत मिळतात. लिप्टन टीज अँड इन्फ्युजनच्या ग्लोबल डायरेक्टर ऑफ रेग्युलेटरी अफेयर्स अँड हेल्थ सायन्सचे आहारतज्ज्ञ जॉय डुबॉस्ट यांनी eatingwell.com ला दिलेल्या मुलाखतीत, ग्रीन टी नेमकी कधी प्यावी किंवा ग्रीन टी पिण्यासाठीची दिवसभरातील उत्तम वेळ कोणती याबद्दल अधिक माहिती दिली आहे. 

ग्रीन टी पिण्याची योग्य वेळ तुम्हांला माहित आहे का ? 

१. जर तुम्ही सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी एक कप ग्रीन टी प्यायलात तर यामुळे शरीर डिटॉक्स करण्यास आणि शरीरातील अँटीऑक्सिडंट्सचे प्रमाण वाढवण्यास मदत करु शकते. कारण त्या वेळी पोटात अन्न किंवा अन्य कोणतेही पोषक घटक नसतात, त्यामुळे ग्रीन टीमधील वनस्पतीजन्य घटकांचे शरीरात शोषण सहजतेने होते.      

२. जर तुम्ही जेवणानंतर लगेच ग्रीन टी प्याल, तर त्यामध्ये असलेले टॅनिन्स (जे ग्रीन टीला सौम्य कडवट चव देतात) शरीरात लोह यांसारख्या महत्त्वाच्या पोषक घटकांच्या शोषणात अडथळा निर्माण करू शकतात. विशेषतः जर तुम्ही शाकाहारी असाल आणि तुमच्या आहारात लोहाची मात्रा कमी असेल, तर ही गोष्ट अधिक महत्त्वाची ठरते. यासाठी, आहारतज्ज्ञ सल्ला देतात की ग्रीन टी जेवणानंतर पिणार असाल तर किमान दोन तासांच्या अंतराने प्यावी किंवा जेवणाच्या किमान दोन तास आधी प्यावी. 

३. आपल्यापैकी काहीजण रात्री झोपण्यापूर्वी ग्रीन टी पितात कारण यामुळे शरीराला आराम मिळतो. परंतु ग्रीन टी मध्ये कॅफिन असते (साधारणतः एका कपात ३० मि.ग्रॅ.), जे तुमच्या रात्रीच्या झोपेमध्ये अडथळा निर्माण करू शकते. यासाठीच, रात्री झोपण्यापूर्वी ग्रीन टी पिणे टाळलेलं चांगलं किंवा त्याऐवजी आपण  हर्बल टी नक्की पिऊ शकता. 

सांधेदुखी सतावते? दीपिका पदुकोणची न्यूट्रिशनिस्ट सांगते 'स्वस्त' घरगुती उपाय - वेदना होतील कमी...

ग्रीन टी तयार करण्याची योग्य पद्धत कोणती ? 

आहारतज्ज्ञ जॉय डुबोस्ट म्हणतात की जर तुम्ही योग्य पद्धतीने ग्रीन टी तयार केली तर त्याचे फायदे देखील आणखीन वाढतात. ग्रीन टी बॅग्स किंवा ग्रीन टी ची पाने उकळत्या पाण्यात ४ ते ५ मिनिटे उकळवून घ्या. जास्त वेळ ठेवू नका नाहीतर त्याची चव फारच कडवट लागते. जर तुम्हाला हवे असेल तर लिंबू किंवा व्हिटॅमिन 'सी' असलेले कोणतेही फळ आपण ग्रीन टी सोबत खाऊ शकतो, यामुळे अँटीऑक्सिडंट्स शोषण्यास मदत होते. ग्रीन टी मध्ये दूध अजिबात मिसळून पिऊ नका. ग्रीन टी मध्ये दूध मिसळल्यास त्याची पोषक तत्व कमी होऊ शकतात. 

दात व हिरड्यांच्या समस्यांवर आजीबाईच्या बटव्यातील उपाय! वापरा घरगुती औषधी दंतमंजन-दात सांभाळा...

तुमच्या शरीराच्या स्थितीचा देखील ग्रीन टीच्या परिणामकारकतेवर महत्त्वाचा प्रभाव पडतो. काही संशोधनांमधून असे आढळले आहे की धूम्रपान करणारे, जास्त वजन असलेले किंवा विशिष्ट अनुवांशिक घटक असलेल्या व्यक्तींना ग्रीन टी मधील अँटीऑक्सिडंट्सचा इतरां इतका फायदा मिळत नाही. याचा अर्थ असा की ग्रीन टी शरीरावर किती परिणाम करेल हे प्रत्येक व्यक्तीच्या शारीरिक स्थितीवर, सवयींवर आणि अनुवंशिकतेवर देखील अवलंबून असते.

Web Title: The Best Time to Drink Green Tea for Maximum Antioxidant Absorption, According to Dietitians best time to drink green tea When is the best time of day to drink green tea

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.