Join us

वजन कमी करण्यासाठी फक्त ज्यूस पित होता, फॅड डाएटने घेतला तरुण मुलाचा जीव

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2025 15:20 IST

Weight Loss Risks: १७ वर्षीय शक्तीस्वरनचा मृत्यू फक्त फळं आणि ज्यूस असलेल्या डाएटमुळे झाला. सोशल मीडियावर पाहून या मुलानं हे डाएट निवडले होते.

Weight Loss Risks:  निरोगी आणि फिट राहण्यासाठी लोक वेगवेगळ्या गोष्टी फॉलो करतात. सोशल मीडियावरील ट्रेण्ड बघून बरेच लोक आपल्या डाएटमध्ये बदल करतात. पण एखादी गोष्ट दुसऱ्यासाठी फायदेशीर ठरेलच असं नाही. अशीच एक घटना तामिळनाडूमधून समोर आली आहे. इथे एक तरुण वजन कमी करण्यासाठी केवळ ज्यूस पित होता. या डाएटला फॅड डाएट म्हटलं जातं. पण काही दिवसांमध्येच त्याचा जीव गेला. ही घटना याचं उदाहरण आहे की, एक्सपर्ट किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणताही ट्रेण्ड किंवा डाएट फॉलो करू नये.

तामिळनाडूच्या कन्याकुमारी जिल्ह्यात राहणारा १७ वर्षीय शक्तीस्वरनचा मृत्यू फक्त फळं आणि ज्यूस असलेल्या डाएटमुळे झाला. सोशल मीडियावर पाहून या मुलानं ही डाएट फॉलो केली होती. तो गेल्या तीन महिन्यांपासून केवळ फळं आणि ज्यूसवर होता. पण वजन कमी करण्यासाठीचा त्याचा हा प्रयत्न जीवावर बेतला. डाएट फॉलो करण्याआधी त्याने कोणत्याही डायटिशिअन किंवा न्यूट्रिशनिस्टचा सल्ला घेतला नव्हता. तो फळांचा ज्यूस पित होता. बाकी काही खात नव्हता. सोबतच काही औषधंही घेत होता. 

फक्त ज्यूस घातक

WION च्या एका रिपोर्टनुसार, डायटिशिअन आणि डायबिटीस एज्युकेटर राधिका ठाकुर सांगतात की, हेल्थ एक्सपर्टच्या देखरेखीशिवाय फॅड डाएट खूप घातक ठरू शकते. लहान मुलं आणि मोठ्यांना कार्बोहायड्रेट, प्रोटीन, व्हिटामिन आणि खनिजांची गरज असते. जेणेकरून त्यांची इम्यूनिटी मजबूत रहावी. पण जेव्हा कधी कुणी केवळ ज्यूसवर अवलंबून राहतं, तेव्हा शरीराला आवश्यक प्रोटीन मिळत नाही. यामुळे स्नायू कमजोर होतात. शरीर आतून कमजोर होतं. एक्सपर्टच्या सल्ल्याशिवाय कोणतीही डाएट करू नये.

अशा डाएटने काय होतं नुकसान?

स्नायू होतात कमजोर

जखमा भरायला वेळ लागतो

हृदय आणि फुप्फुसांच्या स्नायूंवर पडतो प्रभाव

शरीरात इलेक्ट्रोलाइट्स, व्हिटामिन आणि मिनरल्स कमी होतात

ब्लड शुगर जास्त कमी होण्याचा धोका

शरीरात सूज आणि फॅटी लिव्हरचा धोका

काय काळजी घ्याल?

आपल्याला माहीत असलं पाहिजे की, फॅड डाएट, जास्त दिवस उपवास केल्यानं  आपलं शरीर कार्बोहायड्रेटचा ईंधन म्हणून वापर करणं बंद करतं आणि फॅटचा वापर करू लागतं. ज्यामुळे कीटोन्स तयार होतात. जेव्हा कीटोन्स जास्त होतात, तेव्हा रक्तात अ‍ॅसिड वाढतं. यालाच कीटोअ‍ॅसिडोसिस म्हणतात. ही स्थिती जीवघेणी ठरू शकते आणि नुकसान करते.

टॅग्स : हेल्थ टिप्सफिटनेस टिप्स