Join us

सकाळी थोडा वेळ उन्हात फिरणे ठरते आरोग्यदायी, मात्र 'अशी' काळजी घेणे गरजेचेच कारण ..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2025 17:11 IST

Taking a short walk in the morning sunshine is healthy, just don't make 'these' mistakes : कोवळ्या उन्हात फेरफटका मारणे आरोग्यासाठी फायद्याचे.

दुपारी घराबाहेर पडायचे म्हणजे अगदी नको वाटते. कारण उन्हाच्या झळा अगदी त्वचेला खराब करुन टाकतात. मात्र तुम्हाला माहिती आहे का? हे उन्ह आरोग्यासाठी फायद्याचे असते. अर्थात दुपारी १२च्या दरम्यानचे ऊन नाही तर सकाळचे कोवळे ऊन. (Taking a short walk in the morning sunshine is healthy, just don't make 'these' mistakes )ते आरोग्यासाठी चांगले असते. सकाळच्या कोवळ्या सूर्यकिरणांमध्ये शरीराला आवश्यक असलेले अनेक पोषक घटक असतात. विशेषतः जीवनसत्त्व 'डी' तयार करण्यासाठी सूर्यप्रकाश हा नैसर्गिक आणि सर्वोत्तम स्रोत आहे. त्यामुळे दररोज थोडावेळ उन्हात फिरणे ही एक चांगली सवय ठरते.

सकाळच्या सूर्यप्रकाशात फिरल्याने शरीरातील हाडे मजबूत राहतात, कारण सूर्यप्रकाश त्वचेमार्फत जीवनसत्त्व डी निर्माण करतो, जे कॅल्शियम देण्यातही मदत करते. तसेच रक्ताभिसरण सुधारते, थकवा कमी होतो आणि मन प्रसन्न राहते. उन्हात थोडे चालल्याने शरीरातील ऊर्जा वाढते आणि रोगप्रतिकारक शक्ती सुधारते. सूर्यप्रकाशामुळे मेंदूत सेरोटोनिन नावाचे हॉर्मोन तयार होते, जे मेंदूच्या कार्यासाठी आणि इतरही हार्मोन्ससाठी फायद्याचे असते.  त्यामुळे सकाळी फिरणे हे फक्त शरीरासाठीच नव्हे तर मानसिक आरोग्यासाठीही उपयुक्त ठरते.

उन्हात फिरण्यासाठी सर्वोत्तम वेळ म्हणजे सकाळी साडेसहा ते नऊ. या वेळी सूर्यप्रकाश कोवळा असतो आणि शरीराला आवश्यक किरणे मिळतात, महत्वाचे म्हणजे त्वचेला नुकसान होत नाही. दुपारच्या कडक उन्हात फिरणे टाळावे, कारण त्या वेळी अल्ट्राव्हायोलेट किरणे त्वचेवर दुष्परिणाम करु शकतात. सत्वे मिळाली तरी त्वचा खराब होते. सूर्यप्रकाशामुळे खराब झालेली त्वचा पून्हा नीट व्हायला वेळही फार लागतो.  

उन्हात जाताना मात्र काळजी घ्यावी. डोळ्यांवर सनग्लासेस लावा. डोक्यावर टोपी घाला किंवा मग स्कार्फ घ्या. पाणी जवळ ठेवावे आणि हलके, सुती किंवा कॉटनचेच कपडे घालावेत. जर त्वचा संवेदनशील असेल तर कोवळ्या उन्हात जातानाही थोडे सनस्क्रीन लावावे. थोडक्यात सांगायचे झाले तर, कोवळ्या उन्हात थोडावेळ फिरणे ही अत्यंत आरोग्यदायी सवय आहे. यामुळे शरीर मजबूत राहते, मन प्रसन्न होते आणि दिवसाची सुरुवात ऊर्जा आणि सकारात्मकतेने होते.  

English
हिंदी सारांश
Web Title : Morning Sun Exposure: Healthy Benefits and Essential Precautions Explained

Web Summary : Morning sunlight boosts vitamin D, strengthens bones, and uplifts mood. Aim for 6:30 to 9 AM. Protect skin with sunscreen, sunglasses and hats. Stay hydrated for optimal health benefits.
टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्यहोम रेमेडीत्वचेची काळजी