Kidney Problem Symptoms : किडनी शरीरातील महत्वाच्या अवयवांपैकी एक आहे. किडनीच्या माध्यमातून शरीरातील वेस्टेज किंवा विषारी पदार्थ बाहेर काढले जातात. तसेच किडनीद्वारे रक्त फिल्टर करण्याचं देखील काम होतं. अशात किडनीचं आरोग्य चांगलं ठेवणं फार महत्वाचं ठरतं.
त्यामुळे किडनीमध्ये कोणतीही समस्या झाली तर ती ओळखणं आणि त्यावर लगेच उपचार करणं गरजेचं असतं. अनेकदा किडनीमध्ये गडबड झाल्यावर मुख्यपणे सकाळी काही लक्षणे दिसतात. आज आम्ही अशाच काही लक्षणांबाबत आपल्याला सांगणार आहोत.
सकाळी थकवा आणि कमजोरी
जर तुम्ही सकाळी झोपेतून उठल्यावर थकवा आणि कमजोरी जाणवत असेल तर हा एक गंभीर संकेत असू शकतो. किडनीच्या समस्येमुळे शरीरात टॉक्सिन जमा होऊ लागतात, ज्यामुळे सकाळी झोपेतून उठल्यावर नेहमीच थकवा जाणवतो.
लघवीमध्ये बदल
सकाळी सकाळी लघवीचा रंग आणि प्रमाण तुमच्या किडनी हेल्थचा महत्वाचा संकेत होऊ शकतो. जर लघवीचा रंग फार जास्त डार्क पिवळा असेल, लघवीतून फेस तयार होत असेल, पुन्हा पुन्हा लघवी लागत असेल तर हा किडनीच्या समस्येचा संकेत असू शकतो.
पोटात मुरडा येणे
सकाळी झोपेतून उठताना पोटात सूज किंवा मुरडा येत असेल तर हा किडनी योग्यपणे काम करत नसल्याचा संकेत असू शकतो.
जास्त तहान लागणे
जर सकाळी झोपेतून उठल्यावर तुम्हाला जास्त तहान लागत असेल, तर हाही एक संकेत असू शकतो. किडनीची समस्या झाल्याने शरीरातील पाण्याचं संतुलन बिघडतं. ज्यामुळे तुम्हाला अधिक तहान लागते.
त्वचेवर खाज
किडनीची समस्या असल्याने शरीरात टॉक्सिन जमा होऊ लागतात. ज्यामुळे त्वचेवर खाज, रॅशेज आणि इतरही समस्या होऊ लागतात. सकाळी झोपेतून उठल्यावर तुम्हाला त्वचेवर खास येत असेल तर याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका.
चेहरा किंवा पाय सुजणे
सकाळी उठल्यावर डोळ्याखाली सूज, चेहरा फुललेला किंवा पायात सूज दिसणे.
तोंडात कडवटपणा
किडनी कमजोर झाल्यास सकाळी उठल्यावर तोंडात विचित्र चव / कडवटपणा जाणवू शकतो.
श्वास घेण्यात त्रास
शरीरात फ्लुइड जमा होत असल्यास सकाळी जास्त दम लागत असल्याचं जाणवू शकतं.
ही लक्षणं दिसत असल्यास काय करावे?
भरपूर पाणी प्या
मीठ कमी खा
प्रोटीनचे प्रमाण नियंत्रित ठेवा
रक्त तपासणी आणि किडनी फंक्शन टेस्ट (KFT) करून घ्या
डॉक्टरांचा सल्ला घ्या
Web Summary : Kidney problems often manifest in the morning. Watch for fatigue, changes in urine, stomach cramps, excessive thirst, itchy skin, swelling, bitter taste, and shortness of breath. Drink water, reduce salt, control protein, and consult a doctor.
Web Summary : किडनी की समस्याएँ अक्सर सुबह प्रकट होती हैं। थकान, मूत्र में परिवर्तन, पेट में ऐंठन, अत्यधिक प्यास, खुजली वाली त्वचा, सूजन, कड़वा स्वाद और सांस की तकलीफ पर ध्यान दें। पानी पिएं, नमक कम करें, प्रोटीन को नियंत्रित करें और डॉक्टर से सलाह लें।