Heat In Liver Symptoms: शरीरातील वेगवेगळी अवयवं वेगवेगळी कामं करतात. त्यात लिव्हरचं काम खूप जास्त महत्वाचं असतं. शरीर डिटॉक्स करण्यासोबतच लिव्हर शरीरासाठी 500 पेक्षा जास्त कामं करतं. लिव्हर रक्त साफ, पचन तंत्र मजबूत करणे आणि शरीरातील विषारी तत्व बाहेर काढण्यास मदत करतं. जर लिव्हरनं काम करणं बंद केलं तर शरीरात विषारी तत्व जमा होतील. आणि शरीर वेगवेगळ्या आजारांनी वेढलं जाईल. जास्त तेलकट, मसालेदार पदार्थ, मद्यसेवन आणि तणावामुळे लिव्हर बिघडतं. या गोष्टींमुळे फॅटी लिव्हर किंवा लिव्हर सिरोसिस अशा समस्या होऊ शकतात. अशात लिव्हरमध्ये उष्णता वाढल्याचे काही संकेत शरीरात दिसतात. तेच आज आपण पाहणार आहोत.
लिव्हरमध्ये उष्णता वाढण्याची लक्षणं
लिव्हरमध्ये जर उष्णता वाढली तर याची लक्षणं सगळ्यात आधी चेहऱ्यावर दिसतात. जर सतत तोंडात फोडं येत असतील, जिभेवर फोड किंवा तोंडात जळजळ होत असेल, चेहऱ्यावर पुरळ येत असेल, खाज येत असेल, सतत चिडचिड होत असेल, इतकंच नाही तर पचनास समस्या होत असेल तर लिव्हरमध्ये गडबड आहे असं समजा.
लिव्हरमध्ये उष्णता वाढण्याचा तोंडावर प्रभाव
नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनुसार, ज्या लोकांना जास्त दिवसांपासून लिव्हरची समस्या असते, त्याचा त्यांच्या तोंडावर प्रभाव दिसून येतो. लिव्हरमध्ये उष्णता वाढली तर तोंडात फोड येतात. काही लोकांच्या जिभेवर पांढरे किंवा लाल चट्टे डाग दिसतात. तसंच तोंड कोरडं पडतं, टेस्टही जाणवत नाही. अशात जास्त दिवस जर हिरड्यांमध्ये सूज असेल तर शरीरात इन्फेक्शन आणि सूज वाढते. ज्यामुळे आतड्या आणि लिव्हर दोन्हींवर प्रभाव पडतो.
लिव्हरची उष्णता कशी कमी कराल?
तोंड आणि दातांची काळजी घ्या
रोज सकाळी आणि रात्री झोपण्यापूर्वी दात घासा. फ्लॉसचा वापर करा, ज्यामुळे दातांच्या मधल्या भागात जंतू आणि अन्नकण साचणार नाहीत. हिरड्यांमध्ये सूज, रक्त येणे किंवा वेदना जाणवत असतील, तर लगेच दंतवैद्याचा सल्ला घ्या.
नियमित तपासणी करा
दर काही महिन्यांनी दातांची टेस्ट करा, ज्यामुळे दात आणि हिरड्यांशी संबंधित समस्या लवकर शोधता येतात. यामुळे लिव्हरवरील ताणही कमी राहतो.
पौष्टिक आहार घ्या
आहारात फळं, हिरव्या भाज्या आणि प्रोटीनयुक्त पदार्थ जसे की डाळी यांचा आहारात समावेश करा. हे पदार्थ लिव्हरचं कार्य सुधारतात आणि शरीरातील टॉक्सिन्स कमी करतात.
पुरेसं पाणी प्या
दिवसभरात पुरेसं पाणी प्या, त्यामुळे शरीरातील उष्णता आणि लिव्हरची गरमी कमी राहते. दिवसभरात साधारण 3 ते 4 लीटर पाणी प्यावे.
या गोष्टी टाळा
तळलेले पदार्थ, जंक फूड, मद्यपान आणि अतिप्रमाणात तेलकट अन्न पूर्णपणे टाळा. यामुळे लिव्हरवरील भार वाढतो आणि दातांवरही सड व जीवाणूंचा प्रभाव वाढतो.
Web Summary : Liver heat causes mouth sores, digestion issues. Reduce it by maintaining oral hygiene, a healthy diet, and hydration. Avoid fried and junk food.
Web Summary : लिव्हर की गर्मी से मुंह में छाले, पाचन संबंधी समस्याएं होती हैं। मौखिक स्वच्छता, स्वस्थ आहार और जलयोजन बनाए रखें। तला हुआ और जंक फूड से बचें।