Join us

Swine Flu : भय इथले संपत नाही! भारतात वेगाने वाढतोय स्वाइन फ्लूचा धोका; 'ही' लक्षणं दिसताच व्हा अलर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2025 16:08 IST

Swine Flu : स्वाइन फ्लू (H1N1) च्या रुग्णांमध्ये अचानक वाढ झाली आहे.

भारतात स्वाइन फ्लू व्हायरसचा प्रसार वेगाने होत आहे. स्वाइन फ्लू (H1N1) च्या रुग्णांमध्ये अचानक वाढ झाली आहे. नवीन आकडेवारीनुसार, डिसेंबर २०२४ पर्यंत देशात २० हजारांहून अधिक रुग्ण होते. तर ३४७ जणांचा मृत्यू झाला.  भारतातील विविध राज्यांमध्ये रुग्ण आढळले आहेत. भारतातील कोणत्या राज्यांमध्ये आतापर्यंत किती रुग्ण आढळले हे जाणून घेऊया...

केरळमध्ये २८४६, तामिळनाडूमध्ये १७७७, महाराष्ट्रात २०२७, गुजरातमध्ये १७११ आणि राजस्थानमध्ये ११४९ रुग्णांची पुष्टी झाली आहे. येणाऱ्या काळात रुग्णांची संख्या आणखी वेगाने वाढू शकते. अशा परिस्थितीत, त्याची लक्षणे आणि प्रतिबंधात्मक उपाय जाणून घेणं महत्त्वाचं आहे. भारतात जानेवारी आणि मार्च महिन्यात स्वाइन फ्लूचे रुग्ण झपाट्याने वाढतात. ऑगस्ट आणि ऑक्टोबरमध्येही त्याचे रुग्ण वाढतात. 

स्वाइन फ्लूची ५ प्रमुख लक्षणं

ताप

स्वाइन फ्लूच्या प्रमुख लक्षणांपैकी एक म्हणजे अचानक खूप ताप येणं. तापामुळे थंडी वाजू लागते. 

खोकला

सततचा खोकला हा स्वाइन फ्लूचे आणखी एक सामान्य लक्षण आहे. कोरडा खोकला देखील येऊ शकतो. यासोबत घसा खवखवणे किंवा घशात खाज सुटणे.

अंगदुखी

स्वाइन फ्लूमुळे अंगदुखी आणि सांधेदुखी होऊ शकते. रुग्णांना अनेकदा थकवा जाणवू शकतो आणि संपूर्ण शरीरात अस्वस्थता जाणवू शकते.

डोकेदुखी

स्वाइन फ्लू झालेल्या अनेक लोकांंचं डोकं दुखतं, जे सौम्य ते गंभीर असू शकतं. 

थकवा

स्वाइन फ्लूमुळे खूप थकवा आणि अशक्तपणा येऊ शकतो. थकवा इतका असू शकतो की त्याचा तुमच्या जीवनशैलीवरही परिणाम होऊ शकतो. लक्षणं कमी झाल्यानंतरही थकवा अनेक आठवडे टिकू शकतो.

श्वसनाचे आजार

स्वाइन फ्लू प्रामुख्याने श्वसनसंस्थेवर परिणाम करतो. रुग्णांना नाक गळणे, शिंका येणे आणि श्वास घेण्यास त्रास होणे. काही व्यक्तींना छातीत अस्वस्थता किंवा छातीत दुखू शकतं.  

टॅग्स : स्वाईन फ्लूआरोग्यहेल्थ टिप्स