घाम येणे ही एक साधी नैसर्गिक प्रक्रिया आहे. घाम न येणे खरे तर आजाराचे लक्षण आहे. घाम तर यायलाच हवा. पण घामामुळे रोजची साधी कामं करणंही कठीण जायला लागलं तर? सगळ्यांनाच ही समस्या सतावत नाही मात्र काही जणांच्या हाताला आणि पायाला प्रचंड घाम येतो. (sweaty palms and feet? see the reasons , ignoring it can be extremely dangerous.)पाणी सुटल्यासारखा घाम येतो. तळव्याला घाम आल्यामुळे एखादी वस्तू हातात पकडणेही कठीण होते. चालताना पाय चपलेतून सरकतो. तळव्याला घाम आल्यामुळे घामामुळे पाण्याचे फोड येतात. त्यामुळे चालताना झोंबते. काहीही लिहायचे म्हणजे कागद ओला होतो. एवढा घाम हाताला आणि तळव्याला येतो.
हाताला आणि पायाच्या तळव्याला जास्त घाम येणे याला वैद्यकीय भाषेत Palmar-Plantar Hyperhidrosis असे म्हणतात. ही समस्या काही लोकांमध्ये लहानपणापासूनच दिसते तर काहींमध्ये जसे वय वाढत जाते तशी हळूहळू सुरू होते. हातापायाला घाम येणे सामान्यच आहे मात्र सगळ्यांनाच असा घाम येत नाही. त्यामुळे त्यामागे काही विशिष्ट कारणेही असतात. शरीरातल्या घामग्रंथी जास्त सक्रिय झाल्यावर असे घडते. नसा आणि मेंदूच्या काही हालचालींमुळे या ग्रंथी जास्त सक्रिय होतात. जरी शरीराला उष्णता कमी मिळाली आणि घाम येण्याचे काही कारण नसले तरी काही जणांच्या हातावर भरपूर घाम असतो. बाकी चेहरा, बगल कुठेही घाम येत नाही फक्त तळवेच. त्यामुळे हात, तळवे सतत ओले राहतात आणि पाणी सुटल्यासारखे वाटते.
घामग्रंथी जास्त सक्रिय असणे काही आजार नाही. किंवा चिंता करण्याची गरज नाही. तरी एकदा तपासणी करुन घेणे उपयुक्तच ठरते. कारण काही कारणे असतात ज्यामुळे तळव्यांना घाम येतो. त्यामध्ये ताणतणाव ही एक समस्या आहे. अतिविचार केल्यामुळे किंवा मानसिक ताण आल्यामुळे घाम सुटतो. भीती, चिंता, यामुळेही हाताला घाम येतो. कधी थायरॉइडचा त्रास असण्याची शक्यता ही असते.
यावर उपाय म्हणजे सतत जवळ रुमाल ठेवणे. हात पुसत राहणे. पायात मोकळ्या चपला घाला. बंद चपला आणि मोजे घालणे टाळा. घाम जास्त येईल आणि त्याला बाहेर पडता न आल्यामुळे त्वचेला त्रास होईल. हातापायाला पावडर लावायची. त्यामुळे घामाचे प्रमाण कमी होते. फारच त्रास होत असेल तर एकदा तज्ज्ञांचा सल्ला घ्या.