Flossing Benefits : तोंडाशी संबंधित कोणतीही समस्या असेल, तर तिचा परिणाम संपूर्ण आरोग्यावर होऊ शकतो. जर आपल्याला हिरड्यांचा त्रास, दातांची किड किंवा इन्फेक्शन असेल, तर त्यातून आणखी अनेक समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे संपूर्ण आरोग्य चांगलं ठेवायचं असेल, तर फक्त ब्रश करणं पुरेसं नाही, फ्लॉस करणंही तितकंच महत्त्वाचं आहे. चला तर मग, फ्लॉस करण्याचे फायदे आणि दात निरोगी कसे ठेवावेत ते जाणून घेऊया.
हिरड्या राहतात निरोगी
नियमितपणे फ्लॉस केल्याने तोंडातील बॅक्टेरिया नियंत्रणात राहतात आणि हिरड्यांच्या आजारांचा धोका कमी होतो. फ्लॉस दातांमध्ये अडकलेले अन्नकण काढून टाकतो, त्यामुळे बॅक्टेरिया वाढू शकत नाहीत आणि दात किडण्यापासून बचाव होतो. तोंडाच्या आरोग्याचा संबंध डायबिटीज, रूमेटॉईड आर्थरायटिस आणि काही वेळा अल्झायमरसारख्या आजारांशीही जोडला गेलेला आहे.
हृदय राहते निरोगी
नियमित फ्लॉसिंग केल्याने हिरड्यांचे आजार आणि हृदयरोगांचा धोका कमी होतो. हिरड्यांच्या आजारांमुळे हानिकारक बॅक्टेरिया रक्तामार्गे संपूर्ण शरीरात पसरू शकतात. यामुळे धमन्यांमध्ये प्लाक साचतो आणि सूज निर्माण होते, ज्यामुळे हार्ट डिजीजचा धोका वाढतो. 2024 मधील एका रिव्ह्यूमध्ये असे आढळून आले आहे की हिरड्यांच्या आजारांचा संबंध हृदयरोगामुळे होणाऱ्या मृत्यूच्या धोक्याशीही आहे.
ब्लड शुगर राहते नियंत्रणात
हिरड्यांचे आजार आणि टाइप 2 डायबिटीज यांचा घनिष्ठ संबंध आहे. तोंडाच्या समस्या डायबिटीसची सहावी मोठी गुंतागुंत मानली जाते. संशोधनानुसार, जे लोक नियमितपणे फ्लॉस करतात, त्यांचं ब्लड शुगर अधिक नियंत्रित राहतं आणि हिरड्यांच्या आजारांचा धोका 39% पर्यंत कमी होतो.
पोटाचं आरोग्यही सुधारतं
दात किंवा हिरड्या नीट नसतील, तर अन्न नीट चावणं कठीण होतं. याचा थेट परिणाम पचनसंस्थेवर होतो. तोंडातील बॅक्टेरिया पोटात गेले, तर सूज निर्माण होऊ शकते आणि गुड-बॅड बॅक्टेरियांचा समतोल बिघडतो. सतत असं झाल्यास इन्फ्लेमेटरी बाउल डिजीजसारख्या समस्या वाढू शकतात.
तोंडाचं आरोग्य कसं जपावं?
- फक्त फ्लॉसच नाही, तर दात आणि जीभही नीट स्वच्छ करा
- जास्त डेंटल वर्क असेल, तर वॉटर फ्लॉस उपयोगी ठरू शकतो
- वाकडे-तिकडे दात हिरड्या आणि दातांच्या आरोग्यावर परिणाम करू शकतात; अशावेळी डेंटिस्टचा सल्ला घ्या
- जेवणानंतर शुगर-फ्री च्युइंगम घेऊ शकता; यामुळे लाळ जास्त तयार होते आणि बॅक्टेरियांशी लढण्यास मदत मिळते
