Best Food For Women : सकाळी झोपेतून उठल्यापासून महिलांना वेगवेगळी कामं करावी लागतात आणि सोबतच आपली कामावर जाण्याची तयारी सुद्धा करावी लागते. घरात राहणाऱ्या महिलांना तर दिवसभर कामे करावी लागतात. अशात त्यांना एनर्जीची जास्त गरज असते. अशात शरीरात वेगवेगळ्या समस्या होऊ नये जसे की, हाडं कमजोर होऊ नये, सतत थकवा येऊ नये, अंगदुखी होऊ नये यासाठी काही गोष्टींचा आवर्जून आहारात समावेश केला पाहिजे. अशाच काही गोष्टी आज आपण पाहणार आहोत.
शतावरी
शतावरीनं महिलांची प्रजनन क्षमता, मानसिक आरोग्य आणि हार्मोन्स बॅलन्स करण्यास मदत मिळते. शतावरीनं शरीराला थंवाडा मिळतो. पोटातील उष्णता किंवा चिडचिडपणा कमी करण्यास शतावरी फायदेशीर ठरते. गरम दुधात टाकून प्यायल्यास फायदा अधिक मिळतो.
काळे तीळ
काळ्या तिळांमध्ये कॅल्शिअम, आयर्न आणि हेल्दी फॅट भरपूर असतात. काळ्या तिळांनी हाडांना पोषण मिळतं आणि हार्मोन्सही संतुलित राहतात. खासकरून डिलीव्हरीनंतर आणि मेनोपॉजवेळी महिलांसाठी हे फायदेशीर ठरतात. हे तीळ भाज्यांमध्ये टाकून किंवा असेही भाजून खाल्ले जाऊ शकतात.
आवळा
आवळ्यामधून व्हिटामिन सी भरपूर मिळतं. जे केस, त्वचा, इम्यून सिस्टीम आणि पचनासाठी फायदेशीर असतं. अॅक्नेची समस्या जास्त असेल तर आवळे खूप फायदेशीर ठरतात. रोज सकाळी आवळ्याचा ज्यूस पिणं फायदेशी ठरतं.
रागी
रागीमध्ये सुद्धा कॅल्शिअम, आयर्न आणि अमीनो अॅसिड तत्व भरपूर असतात. जे हाडांना मजबूत करतात आणि झोप चांगली येण्यासाठीही फायदेशीर ठरतात.
तूप
तूप शरीरासाठी खूप फायदेशीर असतं. याचे शरीराला अनेक फायदे मिळतात. तुपानं स्ट्रेस कमी होतो, पचनक्रिया सुधारते, ड्राय स्किनची समस्या दूर होते. रोज एक चमचा तूप पाण्यात टाकून पिऊ शकता.