जर तुम्हाला गॅस, पोट साफ न होणं, सतत पोट फुगणं, गॅस तयार होणं, नेहमी थकवा-सुस्ती वाटणं, तोंडातून दुर्गंध येणं, त्वचेवर दाणे येणं, चेहऱ्याची चमक कमी होणं, डोकेदुखी अशा समस्या उद्भवत असतील तर आतड्यांमध्ये समस्या असल्याचे हे संकेत आहेत. आतड्यांमध्ये घाण जमा झाल्यामुळे अशी समस्या उद्भवते. आतडे पचनक्रियेचा एक महत्वाचा भाग आहेत. (How To Make Come Poop Fast)
शरीरातील आतड्यांचे काम अन्नातून पाणी, मिनरल्स आणि महत्वाची पोषक तत्व घेणं हे असतं. शरीरातील अनावश्यक वस्तू बाहेर फेकण्याचे काम आतडे करतात. आतड्यांचे कार्य व्यवस्थित चालले नाही तर त्यात विषारी तत्व जमा होऊ शकतात. जे पुढे जाऊन गंभीर समस्यांचे कारण ठरतात. (Suman Told Rock Salt Remedy To Clean Intestine Naturally At Home And Beat Constipation Gas)
दात कायम पिवळे दिसतात? झोपण्याआधी चिमूटभर हा पदार्थ दातांवर घासा; सकाळी चमकतील दात
डॉक्टर सांगतात की लोक आजकाल वेगवेगळ्या प्रकारच्या घाणेरड्या पदार्थांचे सेवन करत आहेत. ज्यामुळे आतडे खराब होतात. राजस्थानमधील प्रसिद्ध वैद्य जगदीश सुमन यांनी एक सोपा घरगुती उपाय सांगितला आहे. (What Helps You Poop Soon) ज्यामुळे आतड्यांमध्ये जमा झालेला कचरा सहज बाहेर फेकला जाईल. आतड्यांची सफाई नियमित स्वरूपात करणं गरजेचं आहे.
तुमच्या आतड्यांमध्ये जुना मल जमा झाला असेल तर हा मल अनेक आजारांना निमंत्रण देऊ शकतो. रोज पोट साफ होत नसेल तर हळूहळू मल जमा होतो आणि पोटात जमा होऊन वेगवेगळे आजार निर्माण करतो. आतड्यांची साफसफाई यासाठी गरजेची आहे कारण यातून घाण आणि टॉक्सिन्स बाहेर येतात. काळ्या मिठाचा हा उपाय केल्यानं गॅसेसचा त्रास कमी होतो, ऊर्जा वाढते आणि वजन कमी होण्यासही मदत होते. आतड्यांच्या आजारांपासूनही बचाव होतो. मेंदू, मूड दोन्ही चांगले राहते (Ref). काळं मीठ आतड्यातील मल बाहेर काढण्यास आणि पोट साफ ठेवण्यास मदत करते. ज्यामुळे पचनाच्या समस्याही उद्भवत नाहीत.
हा उपाय करण्यासाठी कोणतं साहित्य लागेल
हा घरगुती उपाय करण्यासाठी १ ग्लास कोमट पाण्यात एक चिमूट काळं मीठ घाला. हा एक प्रकारचा फ्री उपाय आहे जो कोणीही सहज करू शकते. हे मिश्रण तयार करण्यासाठी १ ग्लास कोमट पाण्यात १ चिमूट काळं मीठ लागेल. सकाळी रिकाम्यापोटी या पाण्याचे सेवन करा. तुम्हाला आतडे निरोगी हवी असतील तर हा उपाय कमीत कमी आवड्यातून एकदा करा.