Esophageal Cancer Cause : भारतात चहा म्हणजे अनेकांचा जीव की प्राण, कारण चहाशिवाय त्यांच्या दिवसाची सुरूवातच होत नाही. बरेच लोक दिवसभरही भरपूर कप चहा पितात. गरमागरम चहाचा घोट घशाखाली गेल्याशिवाय अनेकांचं कामातही मन लागत नाही. पण हाच गरमागरम चहाचा कडक घोट अन्ननलिकेच्या कॅन्सरचं (Esophageal Cancer) कारण ठरू शकतो. असं अलिकडेच करण्यात आलेल्या एका शोधातून समोर आलं आहे. सिडनी विश्वविद्यालयाकडून देशातील जवळपास अर्धा मिलियन वयस्कांवर केलेल्या शोधातून समोर आलं की, फार जास्त गरम चहा (Hot Tea) किंवा कॉफी पिण्याचा थेट संबंध अन्ननलिकेच्या कॅन्सरसोबत जुळलेला होता. या शोधातून समोर आलं की, जे व्यक्ती दिवसातून आठ किंवा त्यापेक्षा जास्त कप गरम चहा किंवा कॉफी घेत होते, त्यांच्यामध्ये या कॅन्सरची शक्यता जवळपास सहा पटीने अधिक होती.
अभ्यासकांनी सांगितलं की, जास्त गरम असलेले पेय लाकडातून निघालेल्या धुराच्या आणि लाल मांस खाण्याच्या श्रेणीत येतात. या शोधात दक्षिण अमेरिकेतील काही केसेसचा समावेश करण्यात आला. ज्यातून आढळून आलं की, फार जास्त गरम चहा म्हणजे जवळपास 70 डिग्री सेल्सिअसवर प्यायला जाणारा चहाचा अन्ननलिकेच्या कॅन्सरशी संबंध आहे. आधी मध्य पूर्व, आफ्रिका आणि आशियामध्ये करण्यात आलेल्या शोधातूनही याचं समर्थन करण्यात आलं होतं.
अभ्यासकांनुसार, कॅन्सरचा धोका या गोष्टीवर अवलंबून असतो की आपण एकावेळ किती गरम पेय पदार्थ आणि किती वेळात पिता. यासाठी अभ्यासकांनी वेगवेगळ्या तापमानावर गरम कॉफी पिणाऱ्या लोकांच्या घशातील तापमान चेक केलं. यात त्यांना आढळून आलं की, व्यक्तीनं घेतलेल्या एक घोट चहाचं तापमान अधिक प्रभाव टाकतं. 65 डिग्री सेल्सिअस कॉफीचा एक मोठा घोट घशातील तापमान 12 डिग्री सेल्सिअसपर्यंत वाढवतो.
अभ्यासकांनी पेय पदार्थ घेण्याचं सुरक्षित तापमान आणि पद्धत याबाबतही सांगितलं. त्यांनी 57.8 डिग्री सेल्सिअसला सुरक्षित तापमानाच्या श्रेणीत ठेवलं. तसेच गरम पेय छोटे छोटे घोट घेऊन आणि फुंकर मारून पिण्याचा सल्ला दिला आहे.